शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

'शब्दप्रभू' आडवाणी 5 वर्षात संसदेत किती शब्द बोलले माहित्येय?... धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 13:14 IST

संसद गाजवणारे आडवाणी संपूर्ण देशानं पाहिले आहेत

नवी दिल्ली: कधीकाळी भाजपाच्या प्रखर हिंदुत्वाचे पोस्टरबॉय मानले जाणारे लालकृष्ण आडवाणी आता मात्र फार शांत राहू लागले आहेत. भाजपा विरोधात असताना संसदेत आक्रमक भाषणं करणाऱ्या आडवाणींचा आवाज आता फारसा ऐकूही येत नाही. विरोधात असताना संसद गाजवणाऱ्या आडवाणींचा आवाज गेल्या 5 वर्षात क्षीण झाला आहे. विशेष म्हणजे या काळात भाजपाची सत्ता आहे आणि पक्षाकडे संपूर्ण बहुमत आहे. त्यामुळे 'मार्गदर्शक मंडळातले' आडवाणी शांत का, ते संसदेत का बोलत नाही, याची विरोधकांसह भाजपामध्येही चर्चा आहे. मात्र ही चर्चा अतिशय दबक्या आवाजात होते. आडवाणी किती कमी बोलतात, याची आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे.पंधरावी लोकसभा (2009 ते 2014) आणि सोळावी लोकसभा (2014-19) यांचा विचार केल्यास हे अगदी स्पष्टपणे जाणवतं. गेल्या लोकसभेच्या तुलनेत संसदेतील आडवाणींचे शब्द जवळपास 99 टक्क्यांनी कमी झाले आहेत. गेल्या पाच वर्षात आडवाणी संसदेत 296 दिवस उपस्थित होते. या काळात ते 365 शब्द बोलले. कधीकाळी संसदेत धडाडणारी, सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारी भाजपाची ही तोफ आता अगदी थंड झाली आहे. ज्या पक्षासाठी जीवाचं रान केलं, तो पक्ष पूर्ण बहुमतासह सत्तेत येऊनही आडवाणींना फारसं बोलता येत नाही.लालकृष्ण आडवाणी यांचा आक्रमक अवतार संसदेनं अनेकदा पाहिला. 8 ऑगस्ट 2012 रोजी आसाममधील घुसखोरी आणि राज्यात होणारा हिंसाचार यावर स्थगन प्रस्ताव आणण्यात आला. यावरील चर्चेवेळी संसदेत भाजपाचं नेतृत्त्व आडवाणी यांनी केलं. त्यावेळी संसदेत प्रचंड गदारोळ झाला. लोहपुरुष आडवाणींनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारला अडचणीत आणलं. साडेसहा वर्षांपूर्वी आडवाणींनी केलेल्या त्या भाषणात सत्ताधाऱ्यांनी 50 वेळा व्यत्यय आणला. मात्र भाजपाची मुलूखमैदान तोफ धडाडतच होती. त्या भाषणाचा हिशोब मांडल्यास आडवाणी 4 हजार 957 शब्द बोलले होते. यानंतर 2014 मध्ये देशात निवडणूक झाली. सत्तांतर झालं. भाजपाला संपूर्ण बहुमत मिळालं. त्यानंतर आडवाणींचं धडाकेबाज भाषण काही पाहायला मिळालं नाही. अगदी महिन्याभरापूर्वी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला होता. मोदी सरकारनं संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडलं. हे विधेयक मंजूर झाल्यावर त्याचे आसामवर राजकीय, सामाजिक परिणाम होणार होते. त्यावेळी लोकसभेत गोंधळ सुरू असताना आडवाणी अगदी शांत होते. ते एकही शब्द बोलले नाहीत.  

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग