शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Send Off: विद्यार्थींनींनी भरल्या डोळ्यांनी गाणे म्हटले, निरोपावेळी मॅडमचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 17:07 IST

Send Off: ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत शिक्षक आणि विद्यार्थीनींच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं पाहायला मिळत आहे.

कोलकाता - शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातंच वेगळं असतं. शाळेत, कॉलेजमध्ये अनेक शिक्षकांसमेवत विद्यार्थ्यांचं प्रेमाचं, मैत्रिचं नातं तयार होतं. मात्र, कधी विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झाल्याने त्यांना शाळा किंवा कॉलेज सोडावं लागतं. तर, कधी शिक्षकांची बदली झाल्यामुळे, निवृत्ती झाल्याने त्यांनाही शाळा वा कॉलेज सोडून निरोप द्यावा लागला. विद्यार्थी आणि शिक्षकांमधील निरोपाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावतो. सध्या, अशाच एका निरोप समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत शिक्षक आणि विद्यार्थीनींच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या शिक्षिकेस दोन विद्यार्थींनी हाताला धरुन बागेत घेऊन येतात, या बागेत अनेक विद्यार्थीनी गोलाकार घोळका करुन गुडघ्यावर बसलेल्या दिसतात. या विद्यार्थींनीच्या हातात गुलाबाचे फूल असते, आणि ओठांवर गाणे... तुझमे रब दिखता है.... हा क्षणिक भावूक प्रसंग अनेकांचे मन हेलावून जातो. भरल्या डोळ्यांनीच विद्यार्थींनी आपल्या लाडक्या शिक्षिकेची गळाभेट घेतात.  पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यातील बीकेएपी गर्ल्स हायस्कूलमधील हा व्हिडिओ आहे. या शिक्षिकेचं नाव संपा असून आय लव्ह सिलीगुरी या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.   

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थीSchoolशाळाSocial Viralसोशल व्हायरल