शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप ५० वा स्थापना दिन : ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
By Admin | Updated: June 20, 2016 00:22 IST2016-06-20T00:22:00+5:302016-06-20T00:22:00+5:30
जळगाव : शिवसेनेच्या ५० व्या स्थापनादिनानिमित्त रविवार १९ रोजी बळीराम पेठ शाखेतर्फे गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप ५० वा स्थापना दिन : ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
ज गाव : शिवसेनेच्या ५० व्या स्थापनादिनानिमित्त रविवार १९ रोजी बळीराम पेठ शाखेतर्फे गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.बळीराम पेठ भागातील शिवसेनेचे विभागप्रमुख विपीन पवार, उपविभागप्रमुख जितेंद्र गवळी, शाखाप्रमुख ललित भोळे यांच्या उपस्थितीत रविवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी पाणपोईचे नूतनीकरण तसेच इयत्ता दहावी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गरजु ५० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.यावेळी गजानन पाटील, शहर संघटक हेमराज चव्हाण, उपशहरप्रमुख विलास भदाणे, युवासेनेचे उपशहर प्रमुख विपिन पाटील, उपशाखाप्रमुख निर्भय पाटील, हिमांशु भदाणे, निशांत रतवेकर, मयुर विरपनकर, रूपेश पाटील, जितेंद्र पाटील, चारुदत्त पाटील, महेंद्र राजपूत, सनी सोनार उपस्थित होते.नशिराबाद येथे प्रतिमापूजननशिराबाद येथे शिवसेनेच्या ५० व्या स्थापनादिनानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष विकास धनगर, दगडू माळी, विनायक धर्माधिकारी, चेतन बर्हाटे, कैलास नेरकर, बंडू रत्नपारखे, विजय वाणी, महेंद्र कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)