दुबईतील दाऊदच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करणार
By Admin | Updated: September 7, 2015 18:19 IST2015-09-07T18:19:37+5:302015-09-07T18:19:52+5:30
मुंबईत १९९३ साली झालेल्या बाँबस्फोटांचा प्रमुख सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या युएईमधील संपत्तीवर जप्तीची कारवाई करणार असल्याची माहिती युएई सरकारने भारताला दिली आहे.

दुबईतील दाऊदच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करणार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - मुंबईत १९९३ साली झालेल्या बाँबस्फोटांचा प्रमुख सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारत सरकारने दणका दिला आहे. दाऊदच्या युएईमधील संपत्तीवर जप्तीची कारवाई करणार असल्याची माहिती युएई सरकारने भारताला दिली आहे.
गेल्या महिन्यात युएईच्या दौ-यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावेळी दहशतवाद विरोधातील लढ्यात एकत्र येण्याबाबत तसेच युएईतील दाऊदची संपत्ती जप्त करण्याबद्दलही चर्चा केली होती. त्यावेळी उपस्थित असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दाऊदच्या संपत्तीची सखोल माहिती देणारी यादीही सोपवली होती.
त्याच पार्श्वभूमीवर युएई सरकारने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून दाऊदला जेरबंद करण्याच्या प्रयत्नातील हे एक मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे.