हिंदी दिनाच्या शुभेच्छा देताना सेहवागने ट्विटरवर केली मोठी चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 12:09 IST2017-09-14T12:05:45+5:302017-09-14T12:09:00+5:30
सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारा भारतीय क्रिकेट टीमचा माजी धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग पुन्हा एकदा आपल्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे.

हिंदी दिनाच्या शुभेच्छा देताना सेहवागने ट्विटरवर केली मोठी चूक
मुंबई, दि. 14 - सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारा भारतीय क्रिकेट टीमचा माजी धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग पुन्हा एकदा आपल्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी त्याच्याकडून ट्विट करताना एक चूक झाली आहे. गुरूवारी (14 सप्टेंबर) रोजी हिंदी दिनाच्या निमित्ताने त्याने ट्विट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. पण हे ट्विट करताना त्याने एक चूक केली.
सेहवागने ट्विट करताना 'हिन्दि हमारे राष्ट्र की अभिव्यक्ति का सरलतम स्त्रोत है ! जो बात हिंदी में है वो किसी और में नही! 17 Sept. को हिंदी कमेंट्री ! #HindiDiwas
या ट्विटमध्ये त्याने हिंदी(हिन्दी) ऐवजी हिन्दि लिहिलं. यासोबत स्रोत ऐवजी स्त्रोत लिहिलं. लगेच ट्विटराइट्सकडून सेहवागला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला पण अवघ्या 6 मिनिटात सेहवागने हिंदी शब्द योग्यप्रकारे लिहिला आणि नेटीझन्सच्या ट्रोलिंगपासून बचावला.
हिन्दी *
— Virender Sehwag (@virendersehwag) September 14, 2017