सीमा आणि सचिनला चौकशीसाठी ATS ने घेतले ताब्यात; आता समोर येणार सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 05:30 PM2023-07-17T17:30:08+5:302023-07-17T17:30:59+5:30

पाकिस्तानी सीमा हैदर नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. आता एटीएस या प्रकरणाचा तपास करणार आहे.

seema-haider-husband-sachin-and-father-questioning-up-ats-noida | सीमा आणि सचिनला चौकशीसाठी ATS ने घेतले ताब्यात; आता समोर येणार सत्य...

सीमा आणि सचिनला चौकशीसाठी ATS ने घेतले ताब्यात; आता समोर येणार सत्य...

googlenewsNext


Seema Haider Story: गेल्या काही दिवसांपासून प्रियकरासाठी पाकिस्तानातूनभारतात आलेली सीमा हैदर चर्चेत आहे. अवैधरित्या भारतात आल्यामुळे तिला पोलिसांनी अटक करुन नंतर जामिनावर सुटका केली होती. आता या प्रकरणात एटीएसची एंट्री झाली आहे. यूपी एटीएसने सीमा हैदरसह तिचा पती सचिन आणि सचिनच्या वडिलांना चौकशीसाठी अज्ञातस्थळी नेले आहे. 

आज(दि.17) दुपारी एटीएसचे पथक साध्या वेशात सचिनच्या ग्रेटर नोएडा येथील घरी पोहोचले आणि दोघांना सोबत घेऊन गेले. यादरम्यान मीडियालाही त्या परिसरात बंदी घालण्यात आली होती. एटीएसने सीमा आणि सचिनला नेमकं कुठे नेले आणि कितीवेळ चौकशी करणार, याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. 

नेपाळमध्ये तपास सुरू
दरम्यान, गुप्तचर विभागाने सीमा हैदरचा संपूर्ण रुटमॅप तयार केला आहे. सीमा पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात कशी दाखल झाली, याचा तपास केला जाणार आहे. यात नेपाळमधील वास्तव्य, कोणाला भेटली, या सर्व गोष्टींची माहिती घेतली जाईल. तपास यंत्रणेचे एक पथक नेपाळमध्ये ही सर्व माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जात आहे.

सीमेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत
सीमा हैदर गेल्या अनेक दिवसांपासून भारतात चर्चेचा विषय आहे. सीमावर हेरगिरीचे आरोप आहेत. बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या सीमा हैदरवर कारवाईला विलंब का? पाकिस्तानी आयकार्डवर तिची जन्मतारीख चुकीची असूनही सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवण्यासाठी तुम्ही कशाची वाट पाहत आहात? सीमाबद्दल अनेक खुलासे होत असताना तिला इथे का ठेवले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Web Title: seema-haider-husband-sachin-and-father-questioning-up-ats-noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.