Seema Haider : YouTube वर १ हजार व्ह्यूज झाले की किती पैसे मिळतात?; सीमा हैदरने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 13:55 IST2024-07-24T13:46:08+5:302024-07-24T13:55:19+5:30
Seema Haider : सीमा हैदर आणि सचिन मीना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Seema Haider : YouTube वर १ हजार व्ह्यूज झाले की किती पैसे मिळतात?; सीमा हैदरने केला खुलासा
पाकिस्तानातूनभारतात आलेली सीमा हैदर आणि सचिन मीना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सीमाला विचारलं जातं की, ती सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून किती कमावते?. याला उत्तर देताना सीमाने सांगितलं की, आम्ही चांगले पैसे कमावतो, ज्यावर आमचं कुटुंब चालतं आणि आम्ही आमच्या मुलांसाठी सेविंगही करतो.
यूट्यूबवरून होणाऱ्या कमाईबाबत सीमा म्हणते की, ते खासगी राहू द्या, नाहीतर लोक ओरडतील की एवढे कसे झाले? आम्ही बऱ्यापैकी कमाई करत आहोत. आम्ही मुलांना चांगलं शिक्षण देत आहोत. सीमाला भारतात येऊन एक वर्ष झालं. यावर सीमाने सांगितलं की, सचिनने तिला सोन्याचं लॉकेट भेट दिलं आहे. मुलांसाठी चांदीचे आणि पितळेचे ग्लास आणले आहेत, मुलं त्यातच दूध पितात. हे प्रेम आहे, कोणताही दिखावा नाही.
यूट्यूबवर खूप मेहनत करावी लागते. आमचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. आम्ही फार काही केलं नाही असं सीमाने म्हटलं आहे. तर दुसरीकडे सचिनने आपण कधी YouTuber होऊ असं वाटलं नव्हतं. ही सर्व केवळ देवाची कृपा आहे. YouTube वर खूप मेहनत घ्यावी लागते असं सांगितलं.
सीमाने सांगितलं की, शॉर्टच्या एक लाख व्ह्यूजसाठी एक डॉलर म्हणजे जवळपास ८०-८२ रुपये मिळतात. तुम्ही पाच मिनिटांचा मोठा व्हिडिओ पोस्ट केल्यास, तुम्हाला प्रत्येक हजार व्ह्यूजमागे २५ रुपये मिळतील. जे लोक खूप चांगले कमावतात त्यात दोन गोष्टी असतात. एक म्हणजे जाहिराती मिळवायच्या असतात आणि प्रमोशन करायचं असतं.