सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर? सचिनच्या प्रेमात भारतात आलेली महिला म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 15:44 IST2023-07-14T15:44:02+5:302023-07-14T15:44:41+5:30
Seema Haider And Sachin Story: PUBG गेमद्वारे ओळख झाली, सचिनच्या प्रेमासाठी नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली.

सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर? सचिनच्या प्रेमात भारतात आलेली महिला म्हणते...
Seema Haider And Sachin Story: सीमा हैदर आणि सचिन मीना, ही दोन नावे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहेत. PUBG गेमद्वारे दोघे प्रेमात पडले आणि सचिनसाठी पाकिस्तानी सीमा आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. ती सचिनसोबत ग्रेटर नोएडात राहू लागली, पण पोलिसांनी सीमा आणि सचिनला अटक केली. सध्या दोघेही जामिनावर बाहेर असून, सोबतच राहत आहेत.
सीमाबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत, कोणी तिला गुप्तहेर म्हणत आहेत तर कोणी तिची संपूर्ण कहाणीला बनावट असल्याचे म्हणत आहेत. सत्य काय आहे? हा तपासाचा विषय आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीशो बोलताना सीमाने असल्याच्या वृत्तांचे खंडन केले आहे. ती म्हणाली की, मी गुप्तहेर असते, तर माझ्या मुलांसोबत नाही तर एकटीच भारतात आले असते. लवकर सत्य बाहेर येईल.
सीमाच्या इंग्रजी बोलण्याबद्दल प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले की, ती फक्त पाचवीपर्यंत शिकली आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया अॅप्सच्या वापरातून तिला इंग्रजी बोलता येते. यादरम्यान सचिन मीना याला विचारण्यात आले की, सीमाला पाकिस्तानात पाठवण्याची भीती वाटते का? तर तो म्हणाला - मला अशी भीती नाही. मला आशा आहे की सीमाला भारतीय नागरिकत्व मिळेल आणि ती इथेच राहील.