Security personnel jailed terrorists, encounter a young martyr | सुरक्षा जवानांकडून दहशतवाद्यांना घेराव, सीमेवरील चकमकीत SOG जवान शहीद
सुरक्षा जवानांकडून दहशतवाद्यांना घेराव, सीमेवरील चकमकीत SOG जवान शहीद

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील बटमालू येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासूनच चकमक सुरू आहे. सुरक्षा रक्षकांनी लष्कर कमांडर नवीद जट्ट यास घेराव घातला असून या चकमकीत एक SOG जवानास वीरमरण प्राप्त झाले आहे. तर काश्मीरमधील एक पोलीस आणि सीआरपीएफचे दोन जवान जखमी आहेत. काश्मीरचे डीजीपी एसपी वैद्य यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. 


जम्मू आणि काश्मीरमधील बटमालू येथे मध्यरात्री दहशवाद्यांनी सुरक्षा जवानांवर हल्ला चढवला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यास जवानांनीही जशास तसे उत्तर दिले. बटमालू येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा जवानांना मिळाली होती, त्यानुसार स्थानिक पोलीस आणि सुरक्षा जवानांनी संयुक्तपणे कारवाई करत दहशतवाद्यांनचा सामना केला. सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना घेराव घातल्यानंतर त्यांच्याकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत SOG (स्पेशल ऑपरेशन ग्रुप) चा एक जवान शहीद झाला आहे. दरम्यान, सध्या ऑपरेशन सुरुच असून दहशतवाद्यांना घेराव घातला आहे.  

Web Title: Security personnel jailed terrorists, encounter a young martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.