झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:43 IST2025-04-21T09:25:34+5:302025-04-21T09:43:19+5:30

बोकारोमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. पहाटे ४ वाजल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

Security forces kill 6 Naxalites in Jharkhand's Bokaro | झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले

झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले

झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील लुगु टेकडीच्या पायथ्याशी नक्षलवादी आणि पोलिस आणि सीआरपीएफ पथकामध्ये पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत ६ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांच्या पथकाचे नेतृत्व कोळसा क्षेत्राचे डीआयजी सुरेंद्र कुमार झा, एसपी मनोज स्वर्गियारी आणि इतर अधिकारी करत आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, २०९ कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अॅक्शनच्या जवानांनी ही कारवाई केली. यामध्ये सहा नक्षलवादी मारले गेले आणि दोन इन्सास रायफल, एक सेल्फ-लोडिंग रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आली. कोणत्याही सुरक्षा कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याचे वृत्त नाही. 

Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले

तपास मोहीम सुरू केली

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लुगू टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या चोरगाव मुंडाटोलीभोवती गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांना पहाटे ४ वाजता जाग आली. आम्ही बाहेर जाऊन पाहिले तेव्हा आजूबाजूच्या परिसरात मोठ्या संख्येने पोलिस दल उपस्थित असल्याचे आम्हाला दिसले. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात सखोल तपास मोहीम सुरू केली आहे.

सध्या देशातील नक्षलग्रस्त राज्यांमध्ये सुरक्षा दलांच्या जलद चकमकी पाहायला मिळत आहेत. गेल्या शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व लपलेल्या नक्षलवाद्यांना लवकरच आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले की, सरकार ३१ मार्च २०२६ पूर्वी देशाला नक्षलवादाच्या शापातून मुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे.

'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये शाह म्हणाले, " लपलेल्या नक्षलवाद्यांना मोदी सरकारच्या आत्मसमर्पणाच्या धोरणाचा अवलंब करण्याचे आणि शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करतो." ३१ मार्च २०२६ पूर्वी देशाला नक्षलवादाच्या विळख्यातून मुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे.

Web Title: Security forces kill 6 Naxalites in Jharkhand's Bokaro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.