शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 7:51 AM

जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनंतनागमधल्या बिजबेहरामध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मध्यरात्री चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्कराच्या 3 आरआर आणि एसओजीच्या संयुक्त टीमनं गुरुवारी सकाळी हाऊन बंदर मोहल्ला परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं.या टीमला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा सुरक्षा दलाच्या जवानांची संयुक्त टीम सर्च ऑपरेशन राबवत होती, त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूनं गोळीबार सुरू होता. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आलं. दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित आहेत.सुरक्षा दलाच्या जवानांचं ऑपरेशन ऑलआऊट जारीतत्पूर्वी 20 एप्रिलला दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. सोपोरमधल्या वाटरगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. 13 एप्रिलला शोपियानमध्ये लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. 6 एप्रिलला शोपियानमधल्या इमाम साहिब भागातही दोन दहशतवाद्यांना मारलं होतं. 28 मार्चलाही सुरक्षा दलाच्या जवानांनी शोपियान आणि हंदवाडामध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादterroristदहशतवादी