नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:19 IST2025-07-18T19:05:41+5:302025-07-18T19:19:53+5:30
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. अबुझमद परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांचा समावेश असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली.

नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
शुक्रवारी छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दलांना अबुझमद परिसरातील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली.
यानंतर दुपारी शोध मोहीम सुरू झाली. आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणाहून सहा माओवाद्यांचे मृतदेह, एके-४७/एसएलआर रायफल, इतर शस्त्रे, स्फोटके आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई अजूनही सुरू आहे.
बालासोर प्रकरणाला धक्कादायक वळण, त्या कारणामुळे पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल
काही दिवसापूर्वी नक्षलवादी योगेंद्र पकडला
झारखंडमध्ये सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडच्या (CCL) एका कर्मचाऱ्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या धमकीमागे भाकपाच्या (माओवादी) कोयल-शंख झोन कमिटीचं नाव समोर आलं होतं. आता पोलिसांनी या प्रकरणात चार कुख्यात नक्षलवाद्यांना अटक केली आहे. या नक्षलवाद्यांमध्ये योगेंद्र गंझू उर्फ पवन गंझू या अत्यंत क्रूर नक्षलवाद्याचाही समावेश आहे. याने एका जवानाच्या हौतात्म्यानंतर त्याचं पोट फाडून बॉम्ब पेरण्याचं क्रूर कृत्य केलं होतं.
नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
या नक्षलवाद्यांना अटक करण्यासाठी रांचीचे एसएसपी चंदन कुमार सिन्हा यांनी एक विशेष पथक तयार केलं होतं. गुप्त माहितीच्या आधारे, खलारी पोलीस स्टेशन हद्दीतील बक्सी बंगला चट्टी नदी परिसरात सापळा रचून चार कुख्यात नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. यात योगेंद्र गंझू उर्फ पवन गंझू, मुकेश गंझू, राजकुमार नाहक आणि मनु गंझू यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक भरलेलं देशी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसं आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं आहे.