गुप्तधनाच्या लालसेने चोरट्यांनी खोदले भुयार

By Admin | Updated: January 19, 2015 23:56 IST2015-01-19T23:56:10+5:302015-01-19T23:56:10+5:30

माळेगाव : माळेगावच्या राजवाड्यामध्ये अंतर्गत प्रवेश करण्यासाठी भुयारी चोरवाटा आहेत. सध्या या जागेत शंभुसिंह महाराज हायस्कूल आहे. जुनी इमारत बंदिस्त आहे. ती वापरात नसून काही अज्ञात व्यक्तींनी गुप्तधनाच्या लालसेपोटी बंद असलेले भुयारी मार्ग खोदून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Secretariat dug the hoopla with thieves | गुप्तधनाच्या लालसेने चोरट्यांनी खोदले भुयार

गुप्तधनाच्या लालसेने चोरट्यांनी खोदले भुयार

ळेगाव : माळेगावच्या राजवाड्यामध्ये अंतर्गत प्रवेश करण्यासाठी भुयारी चोरवाटा आहेत. सध्या या जागेत शंभुसिंह महाराज हायस्कूल आहे. जुनी इमारत बंदिस्त आहे. ती वापरात नसून काही अज्ञात व्यक्तींनी गुप्तधनाच्या लालसेपोटी बंद असलेले भुयारी मार्ग खोदून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
१६व्या शतकातल्या चिरेबंदी राजवाड्यात अमरसिंह महाराज जाधवराव राजे यांचे वास्तव्य होते. राजवाड्यामध्ये भूमिगत १४ चिरेबंदी खोल्या आहेत. हा प्रकार आज सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षक व कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आला.
भुयारी मार्गाची भिंत पाडून, दगडाच्या तोडी काढून आतमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. निदर्शनास आल्यानंतर जाधवराव राजांचे वारस नागेेंद्रराजे जाधवराव यांनी पोलीस चौकीस कळविले. साधारण २४ फुटांचे भुयारी मार्गात असणारे दगड, माती चोरट्यांनी खोदाई करून काढले. हा प्रकार शनिवार व रविवार रात्री घडलेला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
चोरांना पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्वरित हलचाली सुरू केलेल्या आहेत़ पोलिसांसमवेत शाळेचे शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
चौकट
राजवाड्यामध्ये दुर्मीळ वस्तू व गुप्तधनाच्या लालसेपोटी चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. चोरांना लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करू, असे गणेश म्हस्के यांनी सांगितले.
------------

Web Title: Secretariat dug the hoopla with thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.