Coronavirus live stats: दुसरी लाट वैऱ्याची! 25 लाख लोकांना संक्रमित करणार; SBI चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 08:01 AM2021-03-27T08:01:29+5:302021-03-27T08:01:45+5:30

Coronavirus Cases: गेल्या वर्षीच्या मे महिन्यानंतर एवढ्या वेगाने पहिल्यांदाच कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. हे पाहता, वॅक्सिनेशन सुरू असतानाही संक्रमणाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक सिद्ध  होऊ शकते, असे मानले जात आहे.

The second wave of corona Virus Will infect 2.5 million people; SBI report | Coronavirus live stats: दुसरी लाट वैऱ्याची! 25 लाख लोकांना संक्रमित करणार; SBI चा अहवाल

Coronavirus live stats: दुसरी लाट वैऱ्याची! 25 लाख लोकांना संक्रमित करणार; SBI चा अहवाल

Next

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पासरू लागली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले असून उद्या रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक सापडू लागले आहेत. ही कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) असल्याचे सांगितले जात आहे. यातच भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) रिसर्च पॅनेलने भारतातील कोरोनाची दुसरी लाट खूप खतरनाक असण्याची भीती व्यक्त केली आहे. (around 25 lakhs people infected by corona in Second Wave.)


स्टेट बँकेच्या पॅनेलने या दुसऱ्या लाटेत २५ लाखांहून अधिक लोक कोरोना संक्रमित होण्याची शक्यता वर्तविली आहे. ही लाट १५ फेब्रुवारीपासून सुरु झाली असून मेपर्यंत सुरु राहिल असेही या पॅनेलने अहवालात म्हटले आहे. 


एसबीआयच्या या अहवालात म्हटले आहे की, कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. 23 मार्चपर्यंतचा ट्रेंड पाहता मे पर्यंत जवळपास 25 लाख लोक कोरोनाने संक्रमित होऊ शकतात. दुसरीकडे कोरोना दिवसेंदिवस नवीन रेकॉर्ड बनवत आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे 59118 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 257 मृत्यू झाले आहेत. 


गेल्या वर्षीच्या मे महिन्यानंतर एवढ्या वेगाने पहिल्यांदाच कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. हे पाहता, वॅक्सिनेशन सुरू असतानाही संक्रमणाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक सिद्ध  होऊ शकते, असे मानले जात आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तर कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत संक्रमित रुग्ण संख्या अधिक वेगाने वाढताना दिसत आहे. पंजाबचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे. येथेही संक्रमितांची संख्या आधीच्या लाटेची सीमारेषा पार करण्यापर्यंत पोहोचली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे तज्ज्ञांनीही मान्य केले आहे. यामुळे महामारीचा प्रकोप वाढताना दिसत आहे.


कोरोनाची दुसरी लाट एप्रिलच्या अखेरीस शिखर गाठेल -
आकडेवारीचा विचार करता, कोरोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात शिखर गाठेल. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या एका अहवालाचा विचार करता, देशात दुसरी लाट एप्रिल महिन्याच्या अखेरीस सर्वोच्च पातळीवर असेल. 15 फेब्रुवारीला सुरु झालेली ही लाट 100 दिवस चालेल. 
अहवालात कोरोनाच्या पहिल्या लाटेतील आकडेवारीसंदर्भातही भाष्य करण्यात आले आहे. अहवालानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि तामिळनाडूचे प्रदर्शन सर्वात खराब होते. तर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमध्ये रोजच्या रोज विक्रमी कोरोना रुग्ण समोर येत आहेत.

Web Title: The second wave of corona Virus Will infect 2.5 million people; SBI report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.