अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू; पहिल्याच दिवशी चर्चेला येणार बिर्लांविरोधी ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 06:33 IST2026-03-08T06:33:07+5:302026-03-08T06:33:30+5:30

काँग्रेससह विराेधी पक्षांनी दाखल केलेल्या या प्रस्तावावर ११८ खासदारांच्या स्वाक्षऱ्या असून, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र यावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. 

Second phase of Budget Session begins tomorrow; Anti-Birla resolution to be discussed on the first day | अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू; पहिल्याच दिवशी चर्चेला येणार बिर्लांविरोधी ठराव

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू; पहिल्याच दिवशी चर्चेला येणार बिर्लांविरोधी ठराव

नवी दिल्ली : संसदेच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत असून, या टप्प्यात पहिल्याच दिवशी काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेस व भाजपने आपल्या सदस्यांसाठी ‘व्हीप’ जारी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत चालेल. 

काँग्रेससह विराेधी पक्षांनी दाखल केलेल्या या प्रस्तावावर ११८ खासदारांच्या स्वाक्षऱ्या असून, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र यावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. 

प्रस्तावाचे भवितव्य काय?

नियमानुसार सभापतींना पदावरून हटवण्यासंबंधीचा प्रस्ताव लोकसभेत साधारण बहुमताने पारित केला जातो. विद्यमान लोकसभेत एनडीएला सुमारे २९० हून अधिक सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे बिर्ला यांच्याविरुद्धचा हा प्रस्ताव मंजूर होणे कठीण आहे. बिर्ला यांच्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी गंभीर आरोप केले आहेत. सभागृहाचे कामकाज सुरू असताना पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचा या पक्षांचा आरोप आहे. 

Web Title : बजट सत्र का दूसरा चरण शुरू; बिड़ला के खिलाफ अविश्वास प्रस्ताव पर चर्चा

Web Summary : संसद का बजट सत्र सोमवार से शुरू हो रहा है, जिसमें स्पीकर ओम बिड़ला के खिलाफ अविश्वास प्रस्ताव पर बहस होने की संभावना है। कांग्रेस और भाजपा ने व्हिप जारी किया। एनडीए के समर्थन से प्रस्ताव पारित होना मुश्किल, विपक्ष ने पक्षपात का आरोप लगाया।

Web Title : Budget Session's Second Phase to Begin; No-Confidence Motion Against Birla

Web Summary : Parliament's budget session resumes Monday, likely debating the no-confidence motion against Speaker Om Birla. Congress and BJP issued whips. NDA support makes the motion's passage unlikely, despite opposition claims of bias.