शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

दुसर्‍या दिवशी दोन मेंढ्यांचा मृत्यू २५ मेंढ्यांवर उपचार सुरू

By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST

वाखरी पालखी तळ विषबाधा प्रकरण : जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्‍यांची भेट

वाखरी पालखी तळ विषबाधा प्रकरण : जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्‍यांची भेट
फोटो क्रमांक : २० पंड ४
फोटो ओळी : वाखरी येथील शिळ्या अन्नाचा कचरा एकत्र करून तो नष्ट करण्यात आला
उपरी : वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर पडलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याने बुधवारी २३ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर गुरुवारी दोन मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय आणखी पंचवीस मेंढ्या अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिली.
आषाढी यात्रेत पंढरपुरात येणार्‍या सात मुख्य पालख्यांचा वाखरी येथे शेवटचा मुक्काम असतो. त्यामुळे या सातही पालख्यांबरोबर आलेल्या लाखो भाविकांची येथे गर्दी असते. भाविकांनी जेवण करून शिल्लक राहिलेले अन्न, पत्रावळ्या पालखी तळावरच टाकल्या होत्या. हेच शिळे अन्न सांगोल्याहून आलेल्या मेंढरांनी मंगळवारी खाल्ल्याने विषबाधा होऊन २५ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तब्बल तीन लाखांहून अधिक नुकसान झाले असल्याने फक्त पंचनामा करू नका, तत्काळ मदत करा, अशी मागणी मेंढपाळांनी प्रशासनाकडे केली आहे.
अद्यापपर्यंत सोलापूर जिल्‘ात दमदारपणे पाऊस न पडल्याने दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेच सांगोला तालुक्यातील काही मेंढपाळ पंढरपूर तालुक्यात मेंढ्या घेऊन आले आहेत. गुरुवारपर्यंत बजरंग मोहन मासाळ यांच्या ७, तुकाराम सिदा सलगर यांच्या ७, पप्पू जयवंत सलगर यांच्या ११ अशा एकूण २५ मेंढ्यांचा मृत्यू होऊन तीन लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. उर्वरित ४५ मेंढ्यांना देखील अन्नातून विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुरुवारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, सहाय्यक आयुक्त डॉ. ए.टी.परिहार, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस.भिंगारे यांनी २५ मेंढ्यांवर उपचार केले आहेत.
नगरपालिकेकडून स्वच्छता मोहिमेचा फार्स
ही घटना घडताच प्रशासनाला जाग आली आहे. वाखरी पालखी तळ हे पंढरपूर नगरपालिकेच्या ताब्यात आहे. यामुळे बुधवारपासून नगरपालिकेने पालखी तळाची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले आहे. गुरूवारी पालखी तळाची स्वच्छता करीत जागोजागी कचर्‍याचे ढीग करून पेटवून दिले. मात्र पालखी तळाच्या बाजूला असलेल्या पत्रावळ्या व शिळे अन्न तसेच असल्यामुळे या स्वच्छता मोहिमेचा फार्सच असल्याचे दिसत आहे.