आयनॉक्स मॉलला सील ठोकले
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:03+5:302015-01-22T00:07:03+5:30

आयनॉक्स मॉलला सील ठोकले
> फोटो ओळी.........जसवंत तुली आयनॉक्स मॉलला सील ठोकताना मनपा कर्मचारीबड्या थकबाकीदाराच्या मुसक्या आवळल्या : २.१५ कोटींचा कर थकीतनागपूर : वारंवार नोटीस बजावल्यानंतरही २.१५ कोटीचा थकीत कर न भरल्याने महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कामठी मार्गावरील इंदोरा चौकातील एस. कपूरसिंग तुली व सरदार मोहब्बतसिंग तुली यांच्या जसवंत तुली आयनॉक्स मॉलला सील ठोकले. यामुळे हादरलेल्या मॉल मालकांनी सायंकाळी ४२ लाखाच्या दंडासह थकबाकीचा भरणा केला.मॉलवर २. १५ कोटींचा कर थकीत आहे. तो भरावा म्हणून आसीनगर झोन कार्यालयातर्फे वेळोवेळी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. परंतु व्यवस्थापनाने १५ तर कधी २० लाखांचा भरणा करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेला एक धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे आयुक्तांनी कारवाईचे निर्देश दिले. यानुसार सील ठोकण्याची कारवाई क रण्यात आली. थकबाकीचा भरणा केल्यानंतर मॉल संचालकांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांचीही भेट घेतली.ही कारवाई आसीनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊ त यांच्या मार्गदर्शनात सहायक कर निर्धारक ए.जे.बोदीले यांच्या नेतृत्वात कर निरीक्षक सुनील मेश्राम, संजय कांबळे, एस. के . रेवस्कर , महेंद्र कांबळे यांच्यासह विभागातील कर्मचाऱ्यांनी केली. कारवाई टाळण्यासाठीमालमत्ताधारकांनी थकबाकी तातडीने भरावी, असे आवाहन झोन अधिकाऱ्यांनी केले आहे.(प्रतिनिधी)