Sealdah-Ajmer Express fire: सियालदह-अजमेर एक्सप्रेसच्या बोगीला आग, प्रवाशांनी खिडकी-दरवाजातून मारल्या उड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 21:13 IST2023-06-06T21:12:26+5:302023-06-06T21:13:11+5:30
Sealdah-Ajmer Express fire: माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहून आग आटोक्यात आणली.

Sealdah-Ajmer Express fire: सियालदह-अजमेर एक्सप्रेसच्या बोगीला आग, प्रवाशांनी खिडकी-दरवाजातून मारल्या उड्या
कौशांबी- नुकतीच ओडिशामध्ये कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनच्या भीषण अपघाताची घटना घडली. त्या घटनेनंतर आता सियालदह-अजमेर (Sealdah-Ajmer Express fire) एक्स्प्रेसच्या सेकंड क्लास बोगीला मंगळवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे कौशांबी जिल्ह्यातील भरवारी रेल्वे स्थानकावर सुमारे 48 मिनिटे ट्रेन थांबवावी लागली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन सियालदहहून अजमेरला जात होती. मंगळवारी दुपारी 1:22 वाजता भारवारी रेल्वे स्टेशनच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ अचानक ट्रेन थांबवावी लागली. ट्रेनच्या मागील बाजूस असलेल्या सेकंड क्लासच्या तिसऱ्या डब्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग पाहून प्रवाशांनी चेन ओढून ट्रेन थांबवली आणि खिडक्या/दारांमधून बाहेर उड्या मारल्या.
आगीची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. 48 मिनिटांनी गाडी गंतव्यस्थानाकडे रवाना झाली. सुदैवाने या घटनेत एकही प्रवासी जखमी झाला नाही. भारवारी रेल्वे स्थानकाचे अधीक्षक डीएन यादव यांनी ही माहिती दिली.