कोटा येथील जवाहर नगर भागात सध्या 'एसडीएम चहावाला' नावाने प्रसिद्ध असलेला गोपाळ सिंह चर्चेचा विषय ठरला आहे. एकेकाळी प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणारा गोपाळ आज आपल्या चहा आणि वडापावच्या स्टॉलमधून दरमहा १,००,००० रुपयांची कमाई करत आहेत. "जर मी एसडीएम झालो असतो तर माझा सुरुवातीचा पगार साधारण ५६,००० रुपयांच्या आसपास असतं. पण देवाने माझ्यासाठी उद्योजकतेचा एक अधिक चांगला आणि स्वतंत्र मार्ग निवडला होता" असं म्हटलं आहे.
झालावाड येथील रहिवासी असलेल्या गोपाळ सिंहने एलडीसी, ग्रामसेवक, कॉन्स्टेबल, वनपाल आणि आरएएस (RAS) यांसह सुमारे १० ते १२ स्पर्धा परीक्षा दिल्या. मात्र एकाही परीक्षेत त्याची निवड होऊ शकली नाही. सततचं अपयश आणि कोरोना काळात बिघडलेली आर्थिक परिस्थिती यामुळे गोपाळ हताश झाला होता, पण त्याने जिद्द सोडली नाही.
२०२२ मध्ये त्याने जवाहर नगरमध्ये 'एसडीएम चहावाला' या नावाने आपल्या स्टॉलची सुरुवात केली. गोपाळ सांगतो की, "अधिकारी झालो असतो तर सरकारी नियम आणि अटींच्या चौकटीत राहून नोकरी करावी लागली असती, पण आज मी स्वतःच्या व्यवसायाचा मालक आहे." चांगलं आयुष्य, घर आणि गाडीचं स्वप्न या छोट्याशा स्टार्टअपच्या माध्यमातून पूर्ण केलं आहे.
आज त्याचा चहा आणि वडापाव कोटातील कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. गोपाळ केवळ चहाच विकत नाहीत, तर संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देखील देतो. दिवसभर विद्यार्थ्यांच्या सहवासात राहून तो मुलांना खचून न जाण्याचा आणि पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला देतो.
कोटातील वाढत्या शैक्षणिक दबावाच्या पार्श्वभूमीवर तो विद्यार्थ्यांना सांगतो की, "कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांचा चेहरा नक्की आठवा." तसेच अभ्यासासोबतच रिकाम्या वेळात काहीतरी छोटं काम करावं, जेणेकरून विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील, असा मोलाचा सल्लाही देतो. एक परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे. अपयश ही नवीन आणि मोठ्या वाटेची सुरुवात असते असं गोपाळने म्हटलं आहे.
Web Summary : Gopal Singh, failed government exams 12 times, now earns ₹1,00,000 monthly from his tea stall, 'SDM Chaiwala,' in Kota. He inspires students, advocating financial independence and resilience after setbacks, viewing failure as a new beginning.
Web Summary : गोपाल सिंह 12 बार सरकारी परीक्षा में फेल हुए, पर अब कोटा में 'एसडीएम चायवाला' के नाम से मशहूर हैं और चाय बेचकर 1 लाख रुपये महीना कमाते हैं। वे छात्रों को प्रेरित करते हैं, असफलता को नई शुरुआत मानते हैं।