शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

कोरोनाची धास्ती! शाळांना पुन्हा टाळे; 20 डिसेंबर ते 07 जानेवारी 2022 पर्यंत सुटी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 4:49 PM

Schools closed : शहरातील सर्व शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांना 20 डिसेंबर ते 07 जानेवारी 2022 पर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे.

चंदीगड : कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता चंदीगडच्या शिक्षण विभागाने सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने म्हटले आहे की, मुलांना कोरोना संक्रमण होण्याच्या वाढत्या धोक्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे, त्यासाठी ऑफलाइन शिक्षण काही काळासाठी थांबविले जाईल.

शहरातील सर्व शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांना 20 डिसेंबर ते 07 जानेवारी 2022 पर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. सरकारने हिवाळी सुट्टीचे वेळापत्रक बदलून सोमवार 20 डिसेंबरपासून शाळा बंद केल्या आहेत. दरम्यान, पहिल्यांदा हिवाळी सुट्टी 27 डिसेंबर ते 05 जानेवारीपर्यंत असल्याने ही मुदत वाढवण्यात आली आहे.

18 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. 2 महिने सर्व वर्ग सुरू केल्यानंतर आता पुन्हा शाळा बंद करण्यात येत आहेत. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच शाळा उघडण्यात आल्या होत्या. मुलांना त्यांच्या पालकांच्या संमतीनेच शाळेत येण्याची परवानगी होती. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अभ्यास सुरू होता.

दरम्यान, गेल्या आठवड्यात चंदीगडमध्ये आढळून आलेली संक्रमणाची 126 नवीन प्रकरणे जुलै महिन्यानंतर सर्वाधिक होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एका आठवड्यातील संसर्गाची ही सर्वाधिक संख्या होती. अशा परिस्थितीत संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य प्रशासनाने शाळांना पुन्हा टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आता 07 जानेवारी 2022 नंतरच शाळा पुन्हा सुरू होऊ शकतील.

ओमायक्रॉनमुळे भीतीचे वातावरणदेशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील रुग्णसंख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,145 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 289 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,77,158 लोकांना गमवावा आपला जीव लागला आहे. देशात आता ओमायक्रॉनमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या