शालेय प्रगती पालकाच्या मोबाइलवर
By Admin | Updated: January 8, 2015 01:15 IST2015-01-08T01:15:44+5:302015-01-08T01:15:44+5:30
राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिकांच्या शाळांमध्ये ‘शाळा दर्पण योजना’ नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात यणार आहे.

शालेय प्रगती पालकाच्या मोबाइलवर
नवी दिल्ली : पाल्याची शाळेतील प्रगती पालकांना नित्यनेमाने कळविण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिकांच्या शाळांमध्ये ‘शाळा दर्पण योजना’ नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात यणार आहे. केंद्रपुरस्कृत या योजनेत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांना सांगितले, या योजनेतून विद्यार्थ्याबाबत पालक ते शाळा यांच्यातील दैनंदिन समन्वय-व्यवस्थापन सांभाळले जाईल. शाळेतील अनेक विषय पालकांपर्यंत पोहाचतच नसल्याने पालक अनभिज्ञ असतात. या योजनेतून विद्यार्थ्यांच्या हजेरीसह त्याच्या प्रगतीचे मूल्यांकन मोबाईल एसएमएसद्वारे पालकांना कळविले जाणार आहे.
युजीसीच्या वतीने निवड आधारीत श्रेणी पध्दत कौशल्य व श्रेणी आधारित आरखडयाबाबत शिक्षणमंत्र्याच्या बैठकीसाठी ते येथे आले होते. तावडे म्हणाले,‘राज्यात अन्य ठिकाणी आयआयएम किंवा इतर संस्था सुरु करण्यासंदर्भात विचार विनीमय सुरु असून, सध्या नागपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्था सुरु करण्यात येणार आहे. याचे पालकत्व अहमदाबाद आयआयएमकडे असेल. मात्र मराठवाड्यासारख्या भागात आयआयएमच्या दर्जाची एक संस्था असावी असे आपले मत आहे. (विशेष प्रतिनिधी)
प्राध्यापकांचा थकीत
पगार देणार
विद्यापीठ अनुदान आयोगाबाबत प्राध्यापकांच्या वेतनाचे वाद असल्याने राज्यातील काही प्राध्यापकांचे पगार थकले होते. त्याबाबत चर्चा झाली असून, ६०० कोटी रूपये त्वरीत दिले जाणार आहे.
च्मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेला साहित्य कला अकादमीच्या भाषा समितीचा अहवाल पुढच्या १५ दिवसांत मिळावा अशी मागणी आपण केली असून २७ फेब्रुवारीच्या मराठी भाषा दिनापूर्वी मराठीला भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी दिल्याचे तावडे यांनी सांगितले.