शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जोपर्यंत शाळा बंद आहेत, तोपर्यंत फी नाही; गुजरात सरकारचा पालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 08:22 IST

गुजरात सरकारने अधिसूचना जारी करुन पालकांना दिलासा दिला आहे.

ठळक मुद्देकोरोना परिस्थितीत शाळा सुरू न करताही अनेक शाळा पालकांकडून फी आकारत होत्या. याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती.

अहमदाबाद : देशातील कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. दररोज कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरात सरकारने मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेची फी भरण्यासंदर्भात दिलासा दिला आहे.

गुजरात सरकारने अधिसूचना जारी करुन  पालकांना दिलासा दिला आहे. गुजरात सरकारच्या अधिसूचनेनुसार शाळा सुरू होईपर्यंत शाळा पालकांकडून फी घेऊ शकत नाहीत. तसेच,  शाळांकडून फीसाठी विद्यार्थी किंवा पालकांवर दबाव आणल्यास जिल्हा शिक्षणाधिऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले आहे.

अधिसूचनेत असे म्हटले आहे की, ज्या पालकांनी विद्यार्थ्यांची शालेय फी जमा केली आहे, त्यांची शाळा उघडल्यानंतर फी परत द्यावी किंवा पुढील महिन्यात त्यांचा विचार केला जाईल. मात्र, गुजरात सरकारच्या या निर्णयाला राज्यातील खासगी शाळांनी विरोध दर्शविला आहे. गुजरातच्या खासगी स्कूल बोर्डाने आत्तापासून ऑनलाईन क्लास घेण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे सध्या शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत शाळा सुरू न करताही अनेक शाळा पालकांकडून फी आकारत होत्या. याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. जनहित याचिकेनंतर गुजरात उच्च न्यायालयाला गुजरात सरकारने आदेश दिले. त्यानंतर गुजरात सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

देशाचा मृत्युदर ३.३६ टक्क्यांवरून २.४३ पर्यंत घसरलाकोरोना रुग्णांची योग्यवेळी होणारी चाचणी व उत्तम उपचार यामुळे १७ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३६ टक्क्यांवरून २.४३ पर्यंतखाली घसरला असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. या खात्याचे वरिष्ठ अधिकारी राजेश भूषण यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना साथीचा नियोजनबद्धरित्या मुकाबला केल्यानेच हे यश साध्य झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील मृत्यूदर ८.०७ टक्के असून त्यापेक्षा तीस राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील मृत्यूदर कमी आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेश दररोज दर दहा लाखांमागे १४०हून अधिक कोरोना चाचण्या करत आहेत. नुसत्या चाचण्या करून उपयोग नाही तर कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून प्रत्येक राज्याने प्रभावी उपाययोजनाही केली पाहिजे.

टॅग्स :SchoolशाळाGujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्या