शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

चिनी कंपन्यांचे घोटाळे; Oppoवर 4389 कोटींच्या करचुकवेगिरीचा आरोप, अनेक ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 3:01 PM

यंत्रणा सातत्याने चिनी मोबाईल कंपन्यांवर कारवाई करत आहेत. Xiaomi आणि Vivo नंतर आता Oppo चे घोटाळे समोर आले आहेत.

नवी दिल्ली: चीनी स्मार्टफोन कंपन्या Xiaomi आणि Vivo नंतर आता Oppo चे नाव आर्थिक गैरव्यवहारात समोर आले आहे. कंपनीवर 4389 कोटी रुपयांची कस्टम ड्युटी चुकवल्याचा आरोप आहे. DRI (Directorate of Revenue Intelligence) ने Oppo Mobile India Pvt Ltd वर कस्टम ड्युटी चुकवल्याचा आरोप केला आहे.

OPPO India भारतात मॅन्युफॅक्चरिंग, असेंबलिंग, होलसेल ट्रेडिंग, मोबाइल हँडसेट डिस्ट्रीब्यूशन आणि अॅक्सेसरीजचा व्यवसाय करते. कंपनी चीनच्या Guangdong OPPO Mobile Telecommunication Corporation Limited ची उपकंपनी आहे. Oppo India, Oppo, OnePlus आणि Realme, अशा अनेक मोबाईल फोन ब्रँडशी संबंधित आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सांगितले की, 'डीआरआयने ओप्पोचे कार्यालय आणि काही प्रमुख व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या घरांवर तपासणी आणि छापे टाकले आहेत. तपासात एजन्सीला असे आढळून आले की, ओप्पो इंडियाने मोबाईल उत्पादनाच्या काही वस्तूंच्या आयातीबाबत योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे कंपनीला 2981 कोटी रुपयांची ड्युटी सूट मिळाली आहे. या तपासात वरिष्ठ व्यवस्थापन कर्मचारी आणि घरगुती पुरवठादारांची चौकशी करण्यात आली आहे.

रॉयल्टीच्या नावाखाली फसवणूक?ओप्पो इंडियाने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना रॉयल्टीच्या नावाखाली पैसेही दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापैकी काही चीनमध्ये आहेत. माल आयात करताना कंपनीने भरलेली रॉयल्टी आणि परवाना शुल्क व्यवहार मूल्यामध्ये उघड केलेले नाही. कंपनीने सीमा शुल्क कायदा 1962 च्या कलम 14 चे उल्लंघन केले आहे. अशाप्रकारे ओप्पो इंडियाने 1408 कोटी रुपयांचे कथित शुल्क वाचवले आहे. याशिवाय कंपनीने 450 कोटी रुपयांची ऐच्छिक ठेव ठेवली आहे. तपासानंतर, ओप्पो इंडियाला 4389 कोटी रुपयांच्या कस्टम ड्युटी प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

जुलैच्या पहिल्या दहा दिवसांतच 1270 कोटींची मालमत्ता जप्त ईडीने (सक्तवसुली संचालनालय) जुलै 2022 या महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत तब्बल 1270 कोटी 71 लाख रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने चालू वर्षात केलेली ही सर्वांत मोठी कामगिरी मानली जात आहे. ईडीने जुलै महिन्यात केलेल्या कारवायांपैकी ॲम्नस्टी इंटरनॅशनल या संस्थेवरील कारवाई वगळता अन्य सर्व कारवाया या मनी लाँड्रिंग कायद्याखाली केल्या आहेत. यातही 9 पैकी 4 प्रकरणांमध्ये झालेल्या कारवायांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झालेल्या प्रकरणांचा समावेश आहे. 

टॅग्स :oppoओप्पोEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयDirectorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालय