सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 06:46 IST2025-10-28T06:45:17+5:302025-10-28T06:46:45+5:30
स्वतः सरन्यायाधीशांनी त्या वकिलाविरुद्ध कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर या वकिलाच्या विरोधात अवमान कारवाई सुरू करण्याचा विचार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. स्वतः सरन्यायाधीशांनी त्या वकिलाविरुद्ध कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे.
न्यायमूर्ती सूर्य कांत, न्या. जॉयमल्य बागची यांच्या खंडपीठाने म्हटले की, न्यायालयात घोषणाबाजी करणे आणि बूट, पादत्राणे फेकणे हा न्यायालयाचा अवमानच आहे. मात्र, पुढे कारवाई करायची की नाही, याचा निर्णय संबंधित न्यायाधीशावरच अवलंबून असतो.