शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Karnatak Election 2018 - खाणसम्राट रेड्डींच्या बेल्लारीमधील प्रचारास सर्वोच्च न्यायालयाची मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 19:21 IST

खाणसम्राट गली जनार्दन रेड्डी यावेळी भाजपा नेते म्हणून बेल्लारीत पक्षाचा प्रचार करण्यास उत्सुक होते. मात्र न्यायालयाची बेल्लारीत प्रवेश करण्यास मनाई असल्याने ते थेट तेथे जाऊ शकत नाही. त्यांनी भावाच्या प्रचारास तेथे जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज न्यायालयाने फेटाळून लावली.

कर्नाटकातील राजकारणात खाणसम्राट जी. जनार्दन रेड्डी यांच्या नावाचा वेगळा दबदबा आहे, एकीकडे न्यायालयीन निर्बंधांमुळे आपल्या बेल्लारी साम्राज्याबाहेर राहणाऱ्या रेड्डींनी भाजपाच्यामागे संपूर्ण बळ उभे केले आहे. सध्या बेल्लारीच्या सीमेबाहेरील एका भाड्याच्या फॉर्महाऊसमधून आपली वॉररुम चालवत असलेल्या रेड्डींचा बेल्लारीत थेट प्रचार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.

बेल्लारी परिसरात रेड्डी बोलतील तसे होते असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवारांसाठी निवडून येण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांचा पाठिंबा यापरिसरात महत्वाचा ठरतो. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गली जनार्दन रेड्डी यांनी भाजपासाठी आपले बळ वापरण्यास सुरुवात केली आहे. बेल्लारीतील भाजपा उमेदवार असलेल्या आपल्या भावाच्या तसेच अन्य भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी एका फॉर्महाऊसमध्ये वॉररुम तयार केली आहे. बेल्लारीत प्रवेश करण्यावर न्यायालयीन निर्बंध असल्याने त्यांनी बेल्लारीच्या सीमेबाहेरील एक फॉर्महाऊस भाड्याने घेतले आहे. एका धान्य व्यापाऱ्याच्या मालकीचे हे फॉर्महाऊस विकत घेण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. मात्र मालकाने नकार देऊन अवघ्या १०१ रुपये भाड्याने फॉर्महाऊस रेड्डींना दिले. ते भाडेही निकालानंतर देण्यास त्यांनी सांगितले आहे. 

 

या फॉर्महाऊसमध्ये दररोज सकाळपासूनच परिसरातील नेते, कार्यकर्ते यांचे येणे-जाणे सुरु असते. तसेच त्यांच्या बैठकाही होत असतात. या सर्वांसाठी फॉर्महाऊसच्या किचनमध्ये भात, रसम, तसेच तांदळापासून तयार केलेल्या स्थानिक नाष्टा नेहमीच तयार केला जात असतो. या वॉररुममधून जनार्दन रेड्डी प्रचाराची सुत्रे जोरदाररीत्या हलवत आहेत. परंतु तरीही यावेळी अटीतटीची लढत होणार असल्याने त्यांनी कसलीही कसर राहू नये यासाठी थेट बेल्लारीत जाऊन प्रचार करण्याचे ठरवले. त्यासाठी न्यायालयाने जारी केलेले प्रवेश बंदीचे निर्बंध हटवण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने आज त्यांची याचिका फेटाळून लावली. तेथे थेट प्रचार करण्यासाठी जाणे आता जी. जनार्दन रेड्डी यांना  शक्य होणार नाही.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८G. Janardhan Reddyजी. जनार्दन रेड्डीB. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाcongressकाँग्रेसBJPभाजपा