SBI Recruitment 2020: government job opening for 3850 posts; 16 august last day | SBI मध्ये विनापरीक्षा नोकरीसाठी अर्ज केला का? उद्या शेवटचा दिवस

SBI मध्ये विनापरीक्षा नोकरीसाठी अर्ज केला का? उद्या शेवटचा दिवस

SBI Recruitment 2020: भारतीय स्टेट बँकेमध्ये अनेक पदांवर भरती सुरु आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. SBI ने या भरतीची जाहिरातही प्रसिद्ध केली असून सरकारी नोकरी (Sarkari Nokari) मिळविण्यास इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. 


एसबीआयच्या भरतीची शेवटची तारीख 16 ऑगस्ट आहे. एकूण 3850 जागा भरण्यात येणार आहेत. गुजरात - 750 पदे, कर्नाटक - 750 पदे, मध्यप्रदेश - 296 पदे, छत्तीसगढ़ - 104 पदे, तमिलनाडु - 550 पदे, तेलंगाना - 550 पदे, राजस्थान - 300 पदे, महाराष्ट्र - 517 पदे (मुंबई वगळता) आणि गोवा गोवा - 33 पदे भरण्यात येणार आहेत. 


या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुरुवात 27 जुलैला झाली होती. तर अखेरची मुदत 16 ऑगस्ट होती. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना SBI careers च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. याठिकाणी या भरतीची लिंक स्लाईडमध्ये देण्यात आली आहे.  


उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2020 रोजी 30 वर्षांपेक्षा कमी असावे. आरक्षणानुसार या वयामध्ये 15 वर्षांची सूट देण्यात आली आहे. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. सामान्य़, ओबीसीसाठी 750 रुपये अर्ज शुल्क आणि अन्य आरक्षणासाठी शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज केल्यानंतर गुणवत्ता यादी तयार केली जाणार असून केवळ मुलाखत घेतली जाणार आहे. यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

पार्थ पवार एकटेच येणार; आजोबांचा राग काका पुतण्याला 'समजावणार'

EPFO मध्ये भ्रष्टाचार; कंपनीकडून 8 लाखांची लाच घेताना सीबीआयची धाड

Video: पुणे! "तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो"; राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी

Independence Day : मुलींचे लग्नाचे वय बदलणार; पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिले संकेत

Independence Day : मोठी घोषणा! नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आजपासून सुरु; पंतप्रधानांनी सांगितला फायदा

आजचे राशीभविष्य - 15 ऑगस्ट 2020; जुने येणे वसूल होईल

IndependenceDay लाल किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना नमन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: SBI Recruitment 2020: government job opening for 3850 posts; 16 august last day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.