सावित्रीबाई फुले शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन

By Admin | Updated: March 21, 2015 00:01 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-21T00:01:07+5:30

उसवाड : येथील सहारा एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, दुगांव या स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी संपन्न झाला.

Savitribai Phule School annual affectionate | सावित्रीबाई फुले शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन

सावित्रीबाई फुले शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन

उसवाड : येथील सहारा एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, दुगांव या स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष ॲड. अन्वर पठाण, दुगांवचे सरपंच विनोद माळी यांच्या हस्ते गुणवंतांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी समूहगीत व नृत्य सादर केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक मनीषा खरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमास सौ. स्वाती ठोंबरे, गुंजाळ, क्षीरसागर उपस्थित होते.(वार्ताहर)
-------

Web Title: Savitribai Phule School annual affectionate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.