उद्यापासून काँग्रेसचे संविधान बचाओ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:19 IST2018-04-22T00:19:11+5:302018-04-22T00:19:11+5:30

देशाचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी नुकतीच केली आहे.

Save the Congress Constitution from tomorrow! | उद्यापासून काँग्रेसचे संविधान बचाओ!

उद्यापासून काँग्रेसचे संविधान बचाओ!

शीलेश शर्मा ।

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारपासून देशभर संविधान बचाओ आंदोलन सुरु केले जाणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी नवी दिल्लीतील तालकोटरा स्टेडियममधून २३ एप्रिलला याची सुरुवात करणार आहेत. याच दिवशी काँग्रेसचे देशभरातील नेते आणि कार्यकर्ते आपापल्या क्षेत्रात या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
देशाचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी नुकतीच केली आहे. महाभियोग चालवण्याआधी हा मुद्दा काँग्रेस पक्षाला जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे. या माध्यमातून देशात लोकशाही कशी धोक्यात आली आहे, हे पटवून द्यायचे आहे.

Web Title: Save the Congress Constitution from tomorrow!