"आम्ही हे जग सोडून जातोय, हा फोटो सर्वांना..."; सौरभने नोकराला पाठवला 'तो' शेवटचा मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 13:37 IST2024-08-15T13:31:06+5:302024-08-15T13:37:50+5:30

सौरभ यांच्या दुकानात काम करणाऱ्या गोलूशी याबाबत चर्चा केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

Saurabh Babbar whatsapp message to servent golu before ends life gone home at night | "आम्ही हे जग सोडून जातोय, हा फोटो सर्वांना..."; सौरभने नोकराला पाठवला 'तो' शेवटचा मेसेज

फोटो - आजतक

सहारनपूरच्या सौरभ बब्बर यांनी आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं, ज्याच्यामुळे सौरभ यांनी पत्नी मोनासोबत नदीत उडी मारली. सौरभ यांच्या दुकानात काम करणाऱ्या गोलूशी याबाबत चर्चा केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. गोलूने सांगितलं की, ९ ऑगस्टच्या रात्री सौरभ दादांनी मला दुकानाची चावी दिली आणि ते निघून गेले. माझ्या घरी ते चावी द्यायला आले होते. मात्र तेव्हापासून ते बेपत्ता होते. 

कमिटी मेंबर्सचे लोक सांगत होते की, १० ऑगस्ट रोजी लकी ड्रॉ होता. दादांनी त्या सर्व लोकांना एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. पण ते स्वत:ला आलेच नाहीत. तसेच फोन पण उचलला नाही. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी त्यांनी वहिनीसोबत आत्महत्या केल्याचं समोर आलं. पण त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. आजतकने गोलूशी संवाद साधला आहे. 

गोलूने सांगितलं की, "मी सौरभ बब्बर यांना १२ वर्षांपूर्वी त्यांनी जेव्हा ज्वेलरी शॉप उघडलं तेव्हापासून ओळखतो. ९ ऑगस्टच्या रात्री सौरभ दादा माझ्याकडे आले आणि मला दुकानाची चावी देऊन निघून गेले. मी दिवसभर सौरभ दादांच्या दुकानात राहायचो आणि रात्री झोपायला घरी जायचो. सर्व काही ठीक चाललं होतं, मला माहीत नाही की अचानक असं कोणतं डिप्रेशन आलं की हे करावे लागलं."

गोलूच्या म्हणण्यानुसार, या घटनेपूर्वी (गंगेत उडी मारण्यापूर्वी) सौरभ दादांनी मला दोन फोटो आणि ऑडिओ व्हॉट्सॲपवर पाठवले होते. फोटो हरिद्वारच्या पुलाचा होता. ते ऑडिओमध्ये म्हणत होते की "गोलू, हे सगळ्यांना दाखव, आम्ही हे जग सोडून जात आहोत." मी खरं सांगतो, दादा आतून इतके उदास होते, डिप्रेशनमध्ये होते हे त्यांनी मला कधीच कळू दिलं नाही.

सहारनपूर येथील रहिवासी असलेले सौरभ बब्बर यांनी कर्जाच्या ओझ्याला कंटाळून पत्नी मोनासह हरिद्वारमधील गंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी सौरभ यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर सहारनपूरला आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, पत्नी मोनाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. या दाम्पत्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. या जोडप्याला दोन मुलं आहेत. 
 

Web Title: Saurabh Babbar whatsapp message to servent golu before ends life gone home at night