शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'या' देशांमध्ये समलैंगिकता अवैध; कुठे फाशी, तर कुठे दिले जातात चाबकाचे फटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 09:31 IST

आज सर्वोच्च न्यायालय समलैंगिकतेच्या वैधतेबद्दल निकाल देणार

नवी दिल्ली: समलैंगिकतेला अपराध मानणाऱ्या कलम 377 च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. दोन व्यक्तींनी परस्परांच्या सहमतीनं ठेवलेले समलैंगिक संबंध वैध की अवैध, यावरील निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात येईल. समलैंगिक संबंधांबद्दल सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र जगातील इतर देशांमध्ये समलैंगिकतेला कायद्याची मान्यता आहे की नाही, याबद्दल जगभरातील इतर देशांचे काय नियम आहेत, याची माहिती असणंदेखील आवश्यक आहे. काही देशांमध्ये समलैंगिकता गुन्हा समजला जातो, तर काही देशांमध्ये तर यासाठी फाशीची शिक्षा सुनावली जाते. या देशांमध्ये सुनावली जाते फाशीची शिक्षासुदान, इराण, सौदी अरेबिया, येमेन या देशांमध्ये समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा दिली जाते. सोमालिया आणि नायजेरिया या देशांमधील काही भागांमध्येही समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना फासावर चढवलं जातं. दोन पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवल्यास त्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद 13 देशांच्या कायद्यांमध्ये आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, कतार या देशांमध्ये समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे. इंडोनेशियात शरीरसंबंध ठेवणाऱ्या पुरुषांना चाबकानं मार दिला जातो. 

या देशांमध्ये समलैंगिक संबंधांना अमान्यबेल्जियम, कॅनडा, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, स्वीडन, आईसलँड, पोर्तुगाल, अर्जेंटिना, डेन्मार्क, उरुग्वे, न्यूझीलँड, फ्रान्स, ब्राझील, इंग्लंड, स्कॉटलँड, लक्झेमबर्ग, फिनलँड, आर्यलँड, ग्रीनलँड, कोलंबिया, जर्मनी, माल्टा या देशांमध्ये समलैंगिक लग्नांना परवानगी आहे. नेदरलँडनं सर्वात आधी म्हणजेच डिसेंबर 2000 मध्ये समलैंगिक विवाहांना कायदेशीर मंजुरी दिली. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं 2015 मध्ये समलैंगिक लग्नांना मान्यता दिली. 2001 मध्ये अमेरिकेतील 57 टक्के जनतेचा समलैंगिक संबंधाना विरोध होता. मात्र 2017 मध्ये 67 टक्के लोकांनी अशा संबंधांना पाठिंबा दिला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय