शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, अखेर बांगलादेश चीतपट
3
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
4
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
5
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
6
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
7
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
8
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
9
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
10
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
11
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
12
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
13
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
14
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
15
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
16
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
17
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
18
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
19
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
20
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

गप्प राहिल्यास उपराष्ट्रपती करू, मलाही दिले गेले होते संकेत; सत्यपाल मलिक यांनी पुन्हा उडवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 7:06 PM

भाजपमध्ये अनेक लोक आहेत, ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयटी छापे टाकू शकतात. सरकारने या भाजपच्या लोकांवरही छापे टाकावेत - मलिक

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. मीही गप्प राहिल्यास उपराष्ट्रपती बनवतो, असे संकेत मलाही मिळाले असल्याचे ते म्हणाले. “पण मी म्हणालो, मी ते करू शकत नाही. भाजपमध्ये अनेक लोक आहेत, ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयटी छापे टाकू शकतात. सरकारने या भाजपच्या लोकांवरही छापे टाकावेत,” असेही ते म्हणाले. राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आपण शेतकऱ्यांमध्येही जाणार असल्याचेही मलिक म्हणाले.

सत्यपाल मलिक हे राजस्थान दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं. जगदीप धनखड या पदासाठी पात्र आहेत. परंतु मी जर गप्प राहिलो तर मलाही उपराष्ट्रपती केलं जाईल असे संकेत मला देण्यात आले होते. परंतु मी असं करणार नाही असं सांगितलं असं बोलताना ते म्हणाले. “जे मला वाटतं ते मी बोलतो, मग यासाठी काहीही करावं लागू द्या, देशही सोडावा लागो. भाजपत. असे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर ईडी, आयटी आणि सीबीआयचे छापे पडायला हवे होते. परंतु असं झालं नाही. हेच कारण आहे ज्यामुळे या संस्थांबाबत देशात वेगळं वातावरण तयार झालं आहे,” असं त्यांनी नमूद केलं.

राहुल गांधींचं कौतुकयावेळी बोलताना मलिक यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं कौतुक केलं. “एक तरूण आपल्या पक्षासाठी काम करतोय हे चांगलं आहे. एक नेता पायी चालतोय, आजकाल असं कोणीही करत नाही. त्यांच्या भारत जोडो यात्रेतून काय संदेश जातोय ते जनताच सांगेल. परंतु त्यांना हे काम ठीक वाटत आहे,” असंही त्यांनी सांगितलं.यापूर्वीही केली होती टीकायापूर्वी सत्यपाल मलिक यांनी अनेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली आहे. दरम्यान, यापूर्वी मलिक यांनी राहुल गांधींचे केवळ कौतुकच केले नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मलिक यांनी निशाणा साधत पंतप्रधान मोदी प्रत्येक तिसऱ्या दिवशी काहीतरी उद्घाटन करत असतात. कदाचित त्या दिवशी काहीच नसेल म्हणून त्यांनी राजपथाचं नाव बदललं असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

राजपथाचं नाव बदलण्याची गरज नव्हतं. जरा त्यांनी दावा केला होता हे नाव देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिलं होतं, इंग्रजांनी नाही, असंही मलिक म्हणाले होते. पंतप्रधान प्रत्येक तिसऱ्या दिवशी उद्घाटन करत असतात. कदाचित गुरूवारी काहीही ठरवण्यात आलं नव्हतं. म्हणून राजपथाचं नाव बदललं आणि त्यांनी याचं उद्घाटन केलं, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी