सरसंघचालकांनी केली माजी प्रचारकांसोबत चर्चा
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:16+5:302015-02-14T23:52:16+5:30
उन्नाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे संघाला समर्पित माजी प्रचारकांसोबत विचारविनिमय केला.

सरसंघचालकांनी केली माजी प्रचारकांसोबत चर्चा
उ ्नाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे संघाला समर्पित माजी प्रचारकांसोबत विचारविनिमय केला.संघातर्फे आयोजित दोन दिवसीय विचारमंथन शिबिरात सहभागी होण्याकरिता भागवत येथे आले आहेत. स्थानिक एसबीएम इंटर कॉलेजच्या सभागृहात या शिबिराच्या समारोपप्रसंगी त्यांनी माजी प्रचारकांसोबत चर्चा केली. या बंदद्वार बैठकीत संघाचे माजी प्रचारक वगळता इतर कुणालाही प्रवेश नव्हता. यावेळी अवध प्रांताचे प्रचारक संजय आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. अवध प्रांतातील १३ जिल्हे आणि इतर २२ जिल्ह्यांमधील जवळपास २०० माजी प्रचारक या विचारमंथनात सहभागी झाले होते. परंतु बैठकीत नेमकी कुठल्या मुद्यांवर चर्चा झाली, याबाबत काहीही सांगण्यास सूत्रांनी नकार दिला. विशेष म्हणजे समारोपाच्या या कार्यक्रमाला पत्रकारांनाही प्रवेश नव्हता. एवढेच नाही तर कुठल्याही माध्यमाने बाहेर माहिती जाऊ नये म्हणून उपस्थितांचे मोबाईलही बंद ठेवण्यात आले होते.(वृत्तसंस्था)