रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला आलेला उपसरपंच; नातेवाईक, ग्रामस्थांनी पकडलं, बेदम मारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 17:07 IST2023-08-21T17:04:33+5:302023-08-21T17:07:50+5:30

रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला आलेला उपसरपंच; नातेवाईक, ग्रामस्थांनी पकडलं, बेदम मारलं

sarpanch came to meet his girlfriend at night family and villagers caught and thrashed | रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला आलेला उपसरपंच; नातेवाईक, ग्रामस्थांनी पकडलं, बेदम मारलं

रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला आलेला उपसरपंच; नातेवाईक, ग्रामस्थांनी पकडलं, बेदम मारलं

राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात एका उपसरपंचला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. हा उपसरपंच रात्रीच्या अंधारात आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. मात्र त्यादरम्यान प्रेयसीच्या कुटुंबीयांना जाग आल्याने गोंधळ झाला. प्रेयसीला नातेवाईकांनी उपसरपंचाला पकडलं. त्यानंतर हा गोंधळ ऐकून गावातील अनेक लोक तेथे जमा झाले. मैत्रिणीच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी उपसरपंचाला बेदम मारहाण केली.

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नसला तरी ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. ही घटना सिरोही जिल्ह्यातील शिवगंज भागातील असल्याची माहिती आहे. तेथे शनिवारी रात्री उशिरा एका ग्रामपंचायतीचे उपसरपंच आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचले होते. प्रेयसीसोबत असताना त्याच्या कुटुंबीयांची झोप उडाली. प्रेयसीच्या नातेवाईकांनी उपसरपंचाला रंगेहाथ पकडलं. 

सगळ्यांनी मिळून उरसरपंचाला खूप सुनावलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार रात्री जवळपास दोन तास चालला. मारहाण झाल्यानंतर उपसरपंचाने तेथून पळ काढणेच योग्य समजले आणि आपली स्कूटी घेऊन पळ काढला. सकाळपर्यंत ही बाब जगजाहीर झाली. दोन्ही पक्षांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. 

यापूर्वीही अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. भिलवाडा येथेही असेच एक प्रकरण समोर आले होते. तेथे एक प्रियकर आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी सासरच्या घरात घुसला होता. मात्र प्रेयसीच्या सासरच्या मंडळींना जाग आल्यानंतर त्यांनी त्याला पकडलं. नंतर प्रियकर आणि प्रेयसीला बेदम मारहाण केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: sarpanch came to meet his girlfriend at night family and villagers caught and thrashed