सरितावरील बंदी कायम; पण पदक मिळाले
By Admin | Updated: December 12, 2014 01:48 IST2014-12-12T01:48:15+5:302014-12-12T01:48:15+5:30
भारतीय महिला बॉक्सर एल. सरितादेवीवर आयबाने (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ) बंदी कायम राखली; पण तिला तिचे कांस्यपदक आता परत देण्यात आले.

सरितावरील बंदी कायम; पण पदक मिळाले
नवी दिल्ली : इंचियोन आशियाई स्पर्धेत पोडियमवर आपले कांस्यपदक नाकारणारी भारतीय महिला बॉक्सर एल. सरितादेवीवर आयबाने (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ) बंदी कायम राखली; पण तिला तिचे कांस्यपदक आता परत देण्यात आले.
आयओएने (भारतीय ऑलिम्पिक संघटना) सरिताला तिचे कांस्यपदक प्रदान केले. आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी आयओएच्या कार्यालयात सरिताला हे कांस्यपदक प्रदान केले. सरिताने आशियाई स्पर्धेत 6क् किलोगटात कांस्यपदक पटकावले होते. सरिताला उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या बॉक्सरविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
सरिताने पंचांवर पक्षपाताचा आरोप करताना दुस:या दिवशी पोडियमवर पदक स्वीकारण्यास नकार दिला आणि हे पदक कोरियन बॉक्सरच्या गळ्यात घातले. त्यानंतर सरिताने या कृतीबद्दल माफी मागितली होती; पण आयबाने शिस्तीचा भंग करणा:या सरितावर निलंबनाची कारवाई केली.
भारतात बॉक्सिंगचे संचालन करणा:या बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जाजोदिया यांनी सरिताला पदक मिळण्याच्या एक दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत प्रथमच संवाद साधला. ते म्हणाले होते, की ‘आयबाने सरिता प्रकरणात सहानुभूतिपूर्वक निर्णय घ्यावा.’ बॉक्सिंग इंडियाने सरिताचे पती थोएबा सिंग व खासगी प्रशिक्षक लेनिन मेती यांना ‘कारणो दाखवा’ नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून 3क् दिवसांच्या आत उत्तर मागविले आहे.
बॉक्सिंग इंडियासह केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आयबाला पत्र लिहून सरिता प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आवाहन केले. (वृत्तसंस्था)