सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 06:52 IST2018-10-31T05:28:46+5:302018-10-31T06:52:19+5:30
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे आज, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण
नवी दिल्ली : ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू आॅफ युनिटी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे उद्या, बुधवारी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.
या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या पुतळ्याचे काम २0१३ साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते.