शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

संविधानिक दर्जा बदलला तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवायला कुणी नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 11:16 IST

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये बदल करून जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेष अधिकारावर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.

ठळक मुद्देभारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये बदल करून जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेष अधिकारावर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.थोडी जरी ढवळाढवळ केली तर जम्मू-काश्मीरमध्ये तिरंग्याचं संरक्षण करणारा आणि तिरंगा फडकवणारा कोणीच उरणार नाही, असा थेट इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला आहे.शुक्रवारी काश्मीरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला.

श्रीनगर, दि. 29- भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये बदल करून जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेष अधिकारावर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यात थोडी जरी ढवळाढवळ केली तर जम्मू-काश्मीरमध्ये तिरंग्याचं संरक्षण करणारा आणि तिरंगा फडकवणारा कोणीच उरणार नाही, असा थेट इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला आहे. शुक्रवारी काश्मीरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला. जर घटनेच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये काही बदल केला किंवा त्याच्याशी छेडछाड केली तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या नॅशनल कॉन्फ्रन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीसारख्या मुख्य प्रवाहातील पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आयुष्य धोक्यात येईल, असा थेट इशारा मूफ्ती यांनी दिला आहे. काश्मिरी जनतेच्या विशेष अधिकारात कोणतीही ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नसून त्याबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचंही मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.  संविधानातील अनुच्छेद ३५ (अ) रद्द करण्यासंबंधी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ३५ अ नुसार जम्मू-काश्मीरमधील आमदार आणि खासदारांना विशेष सवलती देण्यात येतात. घटनेमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. काश्मीरप्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. विशेषाधिकारांवर हल्ले करून हा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा करायचा नाही, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.या कार्यक्रमात बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलं. तसंच माझ्यासाठी भारत म्हणजेच इंदिरा गांधी आहेत, असं सांगितलं. काही वृत्तवाहिन्यांवरील प्राइमटाइम शोमध्ये ज्या पद्धतीनं भारताबाबत सांगितलं जातं त्यामुळे मी नाराज असल्याचंही मुफ्ती म्हणाल्या आहेत. यामुळे भारत आणि काश्मीरमधील दरी आणखी वाढण्यास मदत होते आहे, असं मत त्यांनी मांडलं आहे. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान ज्या भारताबद्दल बोललं जातं तो भारत देश मला माहिती नाही, असंही मुफ्ती म्हणाल्या आहेत. टेरर फंडिंगच्या आरोपाखाली एनआयएने फुटीरतावादी नेत्यांची धरपकड केली आहे. पण अशी धरपकड करून मुख्य समस्या सुटणार नाही, असं सांगतानाच पीडीपी आणि भाजप आघाडी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील परिस्थिती काश्मीरमध्ये पुन्हा निर्माण करण्यात यशस्वी होईल, अशी आशाही मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली आहे.