शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचं मंत्रिमंडळ रॅलीत व्यस्त; शहीद निरीक्षकाच्या कुटुंबाकडे साऱ्यांचं दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 16:17 IST

विमानतळावर भाजपा, जदयूचा एकही नेता, मंत्री उपस्थित नव्हता

पाटणा: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेल्या सीआरपीएफ निरीक्षकाचा मृतदेह आज सकाळी पाटण्यात आणण्यात आला. मात्र यावेळी विमानतळावर राज्यातील सत्ताधारी पक्षाचा एकही नेता, मंत्री उपस्थित नव्हता. राजधानी पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्प सभा असल्यानं एनडीएचे नेते, राज्याचे मंत्री व्यस्त होते. याबद्दल शहीद निरीक्षकाच्या कुटुंबीयांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सत्ताधारी पक्षांचे नेते आणि मंत्री विमानतळावर आले होते.सीआरपीएफचे निरीक्षक पिंटू कुमार सिंह यांचं पार्थिव आज सकाळी सव्वा आठ वाजता पाटण्यातील विमानतळावर आणण्यात आलं. त्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. राज्यातील एक निरीक्षक शहीद होतो आणि त्याच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार येत नाहीत, ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याची भावना पिंटू कुमार सिंह यांचे काका संजय सिंह यांनी व्यक्त केली. पिंटू कुमार सिंह बेगुसरायमधील धनचक्की गावचे रहिवासी होते. विमानतळावरुन त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी नेण्यात आलं. पिंटू कुमार सिंह यांचं पार्थिव नेण्यासाठी त्यांचं कुटुंब पाटण्यातील विमानतळावर आलं होतं. यावेळी जिल्हा दंडाधिकारी कुमार रवी, वरिष्ठ पोलीस अधिकारी गरिमा मलिक, सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा आणि लोक जनशक्ती पार्टीचे खासदार चौधरी महबूब अली कैसेर उपस्थित होते. 'मला कोणतंही राजकारण करायचं नाही. मी केवळ श्रद्धांजली वाहायला आलो आहे,' असं यावेळी झा म्हणाले. शहीद निरीक्षकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यायला हवं होतं. त्यांना वेळ नव्हता, तर किमान उपमुख्यमंत्र्यांना पाठवायला हवं होतं, असं कैसेर म्हणाले. कैसेर यांची लोक जनशक्ती पार्टी एनडीएमध्ये सहभागी आहे. 16 फेब्रुवारीला बिहारमधील दोन सीआरपीएफ जवानांचे पार्थिव पाटण्यात आणले होते. या दोन्ही जवानांनी 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलं. त्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटणा विमानतळावर आले होते. मात्र आज मुख्यमंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणताही सहकारी सीआरपीएफच्या निरीक्षकाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी आला नाही. सत्ताधारी भाजपा आणि जदयूचे नेते, मंत्री, केंद्रीय मंत्री संकल्प रॅलीमध्ये आहेत.  

टॅग्स :MartyrशहीदBiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा