संजय रॉयला फाशी द्या; सीबीआयची हायकोर्टात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 08:22 IST2025-01-23T08:20:38+5:302025-01-23T08:22:55+5:30
Kolkata Rape Case: कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या संजय रॉय याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालयात बुधवारी दाखल केली.

संजय रॉयला फाशी द्या; सीबीआयची हायकोर्टात याचिका
नवी दिल्ली - कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या संजय रॉय याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालयात बुधवारी दाखल केली. सेल्डाह न्यायालयाने त्याला सोमवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान, संजय रॉय याला दिलेली शिक्षा पुरेशी नाही, अशा आशयाचे अपील पश्चिम बंगाल सरकारने कोलकाता उच्च न्यायालयात सादर केले आहे. ते दाखल करून घ्यायचे की नाही याचा निर्णय घेण्याआधी सीबीआय, पीडित महिला डॉक्टरचे कुटुंबीय तसेच दोषी व्यक्तीची बाजू ऐकून घेण्यात येईल, असे न्यायालयाने बुधवारी सांगितले. या अपीलावर २७ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. (वृत्तसंस्था)