संजय राऊतांनी केली फडणवीसांची स्तुती; शिंदेंवर टीकेची झोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 07:48 IST2023-04-29T07:47:11+5:302023-04-29T07:48:37+5:30

कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीचे कौतुक

Sanjay Raut praises Fadnavis; Criticism on Shinde | संजय राऊतांनी केली फडणवीसांची स्तुती; शिंदेंवर टीकेची झोड

संजय राऊतांनी केली फडणवीसांची स्तुती; शिंदेंवर टीकेची झोड

सुनील चावके

नवी दिल्ली : नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यामुळे फडणवीस यांच्याशी उद्भवलेल्या सततच्या कटुतेला विराम देण्यासाठी राऊत यांनी पुढाकार घेतल्याचा अर्थ लावला जात आहे.

 ‘विदर्भातील जनतेसाठी फडणवीस यांच्या पुढाकाराने एक भव्य असे कर्करोग इस्पितळ उभे राहिले, हे राजकारणापलीकडचे काम आहे. या चांगल्या कामासाठी फडणवीस यांचे कौतुक करताना आम्हाला अभिमान वाटतो. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी यापूर्वीही राजकारणापलीकडे जाऊन संस्था उभ्या केल्या आहेत. त्या परंपरेला साजेसे हे रुग्णालय उभारण्यात आले असून अशा कार्याचे कौतुक करणे ही आपली संस्कृती आहे,’ असे राऊत म्हणाले. ‘फडणवीस यांच्या वडिलांचेही कर्करोगाशी झुंज देऊन निधन झाले होते. त्या वेदना फडणवीस यांच्या मनात असाव्यात आणि त्यातूनच त्यांनी हे रुग्णालय उभे केले असावे’, अशी भावना राऊत यांनी व्यक्त केली. 

शिंदेंवर टीकेची झोड
एकीकडे फडणवीस यांच्या कामाची तोंडभरून तारीफ करीत असतानाच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा बचाव करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोंडसुख घेतले. देशाच्या राजकारणात बेईमानीचे, गद्दारीचे बीज कोणी रोवले हे सर्वांना ठाऊक आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Sanjay Raut praises Fadnavis; Criticism on Shinde