संजय पोटाम यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक, DSP अंजू कुमारींच्या शौर्याचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 16:29 IST2025-01-26T16:28:07+5:302025-01-26T16:29:23+5:30
President Gallantry Award: नक्षलवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात आलेल्या आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय पोटाम यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक मिळाले आहे.

संजय पोटाम यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक, DSP अंजू कुमारींच्या शौर्याचा गौरव
Sanjay Potam: पोलिसांना शरण आलेल्या एका नक्षलवाद्याला तीन वेळा राष्ट्रपती वीरता पदक मिळेल, असं कुणालाही त्यावेळी वाटलं नसेल. मुख्य प्रवाहात आलेल्या संजय पोटाम यांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपती वीरता पदक मिळाले आहे. त्यांच्याबरोबरच डीएसपी अंजू कुमारी यांचाही राष्ट्रपती वीरता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. २५ जानेवारी रोजी त्यांना पदक जाहीर झाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
छत्तीसगढमधील दंतेवाडात संजय पोटाम पूर्वी नक्षलवादी होते. बदरू असं त्यांचं नक्षलवादी चळवळीतील नाव होतं. २०१३ मध्ये त्यांनी दंतेवाडा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांसाठी गुप्त पोलीस म्हणून काम करू लागले.
ते दंतेवाडा जिल्ह्यात डीआरजी टीममध्ये कार्यरत आहेत. संजय पोटाम यांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारावर दंतेवाडा पोलिसांनी अनेक नक्षलविरोधी मोहिमांत यश मिळवले. त्यामुळे त्यांना सातत्याने सेवेत बढती मिळत गेली. आता ते पोलीस निरीक्षक बनले आहेत.
अनेक नक्षल्यांचा त्यांनी खात्मा केला आहे. काही नक्षलवाद्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले आहे. त्यांच्या या कामगिरीचा यापूर्वी दोन वेळा राष्ट्रपती वीरता पदक देऊन गौरव करण्यात आला. आता तिसऱ्यांदा त्यांना राष्ट्रपती वीरता पदक जाहीर झाले आहे.
अंजू कुमारींनाही राष्ट्रपती वीरता पदक
१८ डिसेंबर २०२१ मध्ये दंतेवाडातील अरणपूर पोलीस ठाणे हद्दीतील पोटाली आणि सुकमा गोंडेरास जंगलात दरभा विभागातील ५०-६० सशस्त्र नक्षलवादी वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. डीएसपी अंजू कुमारी यांच्या नेतृत्वाखाली नक्षलविरोधी मोहीम हात घेतली गेली. यात २ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
दंतेवाडातील ९ पोलिसांचा गौरव
दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव रॉय आणि एएसपी आरके बर्मन म्हणाले की, 'यावेळचा प्रजासत्ताक दिन दंतेवाडा पोलिसांसाठी खूप अभिमानास्पद आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात कार्यरतअसलेल्या ९ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती वीरता पदकाने सन्मानित केले जाणार आहे.'