शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शिमल्यात तणाव वाढला, संजौली मशिदीकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 13:41 IST

Shimla Sanjauli Masjid Protest : आंदोलक पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे सरसावले. मात्र यादरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा वापर केला. 

Shimla Sanjauli Masjid Protest : शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे बेकायदेशीर संजौली मशिदी प्रकरणावरून आज (दि.११) हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. हिंदू संघटना बेकायदा बांधकाम पाडण्याची मागणी करत आहेत. यावरून आता मोठा तणाव निर्माण झाला आहे.

शिमला येथील संजौली येथील मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात बुधवारी हिंदू संघटनांनी मोठे आंदोलन केले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी संजौली ते ढली हा रस्ता बंद केला. मात्र, यावेळी आंदोलकांचा विरोध वाढला. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिमला पोलिसांनी संजौली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ११ वाजता आंदोलनाची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी काही संजौलीतील दुकानं व इतर लोकांना हटवले. यादरम्यान, हिंदू नेते कमल गौतम संजौली चौकात पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना त्यांच्या समर्थकांसह ताब्यात घेतले.

यानंतर पोलिसांनी ढली बाजूचे दोन्ही बोगदे बंद केल्यावर आंदोलकांनी ढली भाजी मंडईत रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले. यानंतर आंदोलक येथून पुढे सरसावले आणि नंतर बॅरिकेड्स तोडले. आंदोलक पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे सरसावले. मात्र, यादरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा वापर केला. 

संजौलीतील आंदोलक मशिदीपासून काही अंतरावर पोहोचले. त्यावेळी, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तसेच, वॉटर कॅननचाही वापर करण्यात आला आहे. मात्र, लोक पाण्यापासून बचाव करण्यासाठी छत्र्या घेऊन घटनास्थळी पोहोचले आहेत. जमाव नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला आहे. सुरुवातील जवळपास १००० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र आंदोलकांना रोखण्यात पोलिसांना अपयश आले. 

दुसरीकडे, कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले की, लोकांनी शांततेने आंदोलन करावे. कायदा आपले काम करत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, हा अस्मितेचा लढा आहे आणि त्यामुळेच संजौलीतील सर्व लोक येथे आले आहेत. हा हिंदू-मुस्लिम वाद नाही, असे आंदोलकांमधील एका व्यक्तीने सांगितले. तर आम्ही शांततेने आंदोलन करत होतो. आम्हाला शांततेने आंदोलन करण्याची परवानगी द्यायला हवी होती, असे आणखी एका आंदोलकाने सांगितले.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliceपोलिसagitationआंदोलन