संजान- उंबरगाव येथे रेल्वे रूळ तुटला, मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 09:20 IST2017-12-22T09:20:35+5:302017-12-22T09:20:41+5:30

शुक्रवारी सकाळी संजान आणि उंबरगाव इथे रेल्वे रूळ तुटल्याची माहिती आहे.

Sanjana-Umargaon rail link in Mumbai, delayed Express trains coming to Mumbai | संजान- उंबरगाव येथे रेल्वे रूळ तुटला, मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या उशिराने

संजान- उंबरगाव येथे रेल्वे रूळ तुटला, मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या उशिराने

मुंबई- शुक्रवारी सकाळी संजान आणि उंबरगाव इथे रेल्वे रूळ तुटल्याची माहिती आहे. पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे रूळ तुटल्याने गुजरातहून मुंबईला येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरानं धावत आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा होण्याची शक्यता आहे. 

मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर संजान आणि उंबरगाव येथे ही घटना घडली. रेल्वे रूळाला तडा गेल्याचं कळताच या मार्गावरील रेल्वेसेवा थांबविण्यात आली. त्यानंतर रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. या दरम्यान गुजरातहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आल्या. रेल्वे रूळ तुटल्यानं रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याचं समजतं आहे. 

Web Title: Sanjana-Umargaon rail link in Mumbai, delayed Express trains coming to Mumbai