संदीप फाउंडेशनच्या एम.बी.ए. विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

By Admin | Updated: August 13, 2015 23:24 IST2015-08-13T23:24:06+5:302015-08-13T23:24:06+5:30

नाशिक : संदीप फाउंडेशनच्या संदीप इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च सेंटर या महाविद्यालयातील व्यवस्थापनशास्त्र विभागातर्फे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता स्वागत समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. व्यवस्थापन शाखेच्या सातव्या बॅचला मार्गदर्शन करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. राकेश पाटील, प्राचार्य डॉ. संजय गंधे, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा. इंद्रजित सोनवणे, स्पायर टॅँक ॲण्ड व्हेसल्स प्रा.लि. चे संचालक प्रणेश चित्रेव ईएसडीएस कंपनीच्या मुख्य लोकाधिकारी कोमल सोनानी उपस्थित होत्या.

Sandeep Foundation MBA Welcome to the students | संदीप फाउंडेशनच्या एम.बी.ए. विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

संदीप फाउंडेशनच्या एम.बी.ए. विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

शिक : संदीप फाउंडेशनच्या संदीप इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च सेंटर या महाविद्यालयातील व्यवस्थापनशास्त्र विभागातर्फे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता स्वागत समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. व्यवस्थापन शाखेच्या सातव्या बॅचला मार्गदर्शन करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. राकेश पाटील, प्राचार्य डॉ. संजय गंधे, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा. इंद्रजित सोनवणे, स्पायर टॅँक ॲण्ड व्हेसल्स प्रा.लि. चे संचालक प्रणेश चित्रेव ईएसडीएस कंपनीच्या मुख्य लोकाधिकारी कोमल सोनानी उपस्थित होत्या.
विभाग प्रमुखांच्या प्रस्तावनेने व मार्गदर्शनपर भाषणाने सदर कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. राकेश पाटील यांनी व्यवस्थापन विभागाची आजवरील कामगिरी व यश विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमास मागील वर्षीच्या बॅचमधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयाबद्दलचे आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. संदीप एन. झा तसेच संदीप फाउंडेशनच्या सरव्यवस्थापिका मोहिनी पाटील व मेन्टॉर प्रा. पी.आय. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

Web Title: Sandeep Foundation MBA Welcome to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.