वाळूज रेग्युलर ३

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:16+5:302015-02-14T23:52:16+5:30

लोकमत इफेक्टरांजणगावात स्वच्छता मोहीम सुरूवाळूज महानगर- रांजणगाव शेणपुंजी येथील नागरी समस्यांसंदर्भात शनिवारी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागे ...

Sandalz Regular 3 | वाळूज रेग्युलर ३

वाळूज रेग्युलर ३

>लोकमत इफेक्ट
रांजणगावात स्वच्छता मोहीम सुरू
वाळूज महानगर- रांजणगाव शेणपुंजी येथील नागरी समस्यांसंदर्भात शनिवारी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोट्यवधी रुपयांची करवसुली होऊनही सुविधा मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली होती. या गावातील नागरी समस्यांसंदर्भात काल लोकमत चमूने गावातील विविध भागांना भेटी देऊन नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. यावेळी संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन वॉर्ड क्रमांक सहामधील नागरिकांना सापत्न वागणूक देत असल्याची ओरड लोकमत चमूसमोर केली होती. गावातील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात आज १४ फेब्रुवारीला लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित करून नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच सरपंच कांताबाई जाधव, उपसरपंच भारत पा. गरड, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब मतसागर व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी या वृत्ताची दखल घेत तात्काळ स्वच्छता मोहीम हाती घेतली. या भागातील त्रिमूर्तीनगर, ऋषिकेशनगर, साईनगर, मातोश्रीनगर, अर्जुननगर, हनुमाननगर, पवननगर, सैलानीबाबानगर, गाडेकरनगर परिसरात ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचार्‍यांनी धाव घेत स्वच्छता मोहीम सुरूकेली. या मोहिमेंतर्गत ठिकठिकाणी साचलेला कचरा कर्मचार्‍यांनी जमा करून वाहनातून या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली. याशिवाय विविध भागात तुंबलेल्या गटार नाल्याची सफाई केली. लोकमतच्या वृत्तामुळे ग्रामपंचायतीला जाग आल्याची प्रतिक्रिया बाबासाहेब बटुळे, अलीम सय्यद, दीपक बडे, भीमराव मोरे, नवाज पटेल, सोमीनाथ नेमाणे, संगीता पा. वाटूळ, रंजना गायके, मीना गिरी आदींसह नागरिकांनी व्यक्त केल्या आहे.
फोटो ओळ- रांजणगाव शेणपुंजी येथील नागरी समस्यांसंदर्भात आज लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम हाती घेत साफसफाई अभियान राबविले.
फोटो क्रमांक-१४ फेब्रु- रांजणगाव १/२

Web Title: Sandalz Regular 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.