शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज २

By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST

पत्रकार भवन नामफलकाचे अनावरण

पत्रकार भवन नामफलकाचे अनावरण
वाळूज महानगर : बजाजनगरातील गोसेवा आश्रमाजवळ औरंगाबाद जिल्हा पत्रकार संघ संलग्नित वाळूज महानगर पत्रकार संघाच्या बाळासाहेब ठाकरे पत्रकार भवन नामफलकाचे जि.प. सदस्य अनिल चोरडिया व ह.भ.प. बालगिरी महाराज यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाला ग्रा.पं. सतीश पाटील, कैलास भोकरे, सचिन गरड, शरद जाधव, विलास इंगळे, परमेश्वर मदन, सुनील राठी, अंकुश पुंड, राजेंद्र अवतारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर कुरणे तर संचालन पत्रकार संघाचे अध्यक्ष भागीनाथ जाधव यांनी केले. आर.के. भराड यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी सचिव धनंजय दारु ंटे, संतोष उगले, संतोष बारगळ, बबन गायकवाड, अशोक आल्हाट, संजय मगरे, सुदाम गायकवाड, संतोष बोटवे आदींनी परिश्रम घेतले.

सिडकोच्या स्वच्छता उत्सव कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शाळकरी मुलांनी जिंकली मने
वाळूज महानगर : सिडको प्रशासन व सीआरटी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वाळूज महानगर सिडको कार्यालयात आयोजित स्वच्छता उत्सव कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या ऑर्चिड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली.
सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर व प्रशासक एच. व्ही. आरगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व एस. एस. वायकर यांच्या देखरेखीखाली सीआरटी संस्थेच्या मदतीने स्वच्छ वाळूज महानगर हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. स्वच्छ व सुंदर सिडको महानगर करण्यासाठी येथील बहुसंख्य महिलांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी सिडको वाळूज महानगर कार्यालयात स्वच्छता उत्सवाचे आयोजन केले होते. केरकचरा, टाकाऊ पदार्थ इ.पासून बायोगॅस व कंपोस्ट खत निर्मिती कशी केली जाते व घनकचरा व्यवस्थापन कशा प्रकारे करावे याविषयीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यशस्वीतेसाठी सिडक ोचे शशिकांत वाईकर, राजेंद्र शहापूरकर, सीआरटीच्या संचालिका नताशा जरीन, गौरी मिराशी, सनविरा छाबडा, स्नेहा बक्षी यांच्यासह सिडकोच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ -
सिडको वाळूज कार्यालयात प्रशासनातर्फे स्वच्छता उत्सव कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तंूची पाहणी करताना नागरिक.
(छाया - आतिश वानखेडे)
फोटो क्रमांक - १७ एप्रिल, प्रदर्शन १/२