प्रांताधिकार्यांच्या वाहन चालकासह शिपायास वाळू तस्करांची मारहाण
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:03+5:302015-03-20T22:40:03+5:30
प्रांताधिकार्यांच्या वाहन चालकासह शिपायास वाळू तस्करांची मारहाण

प्रांताधिकार्यांच्या वाहन चालकासह शिपायास वाळू तस्करांची मारहाण
प रांताधिकार्यांच्या वाहन चालकासह शिपायास वाळू तस्करांची मारहाणचौघांवर गुन्हा : लोहोणेर येथील घटनानाशिक : देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे गुरु वारी मध्यरात्री वाळू तस्करांच्या तपासासाठी आलेल्या सटाणा उपविभागीय अधिकार्यांच्या वाहन चालकास व शिपायास वाळू तस्करांनी मारहाण व दमदाटी केल्याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सटाणा येथील उपविभागीय अधिकारी संजय बागडे व पोलीस उपअधीक्षक विनायक ढाकणे हे गुरुवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान ठेंगोडा (ता.बागलाण) येथे वाळू गस्तीसाठी आले होते. रात्रीच्या वेळेस गिरणा नदीवरील पुलावरून जात असताना गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टरांचे दिवे चालू दिसल्याने शासकीय वाहनांचा ताफा लोहोणेर येथील मारु ती मंदिरानजीक असलेल्या नदीपात्रात जाणार्या रस्त्यांवर दाखल झाला. अचानक आलेल्या शासकीय, महसूल व पोलीस कर्मचार्यांच्या वाहनांचा ताफा पाहून वाळू तस्करांची पाचावर धारण बसली; काहींनी तेथून पळ काढला. हाती लागलेल्या काही वाहनांची (ट्रॅक्टर) हवा काढण्याचा प्रयत्न शासकीय कर्मचार्यांनी केला. ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा काढण्यास शासकीय वाहनातून खाली उतरलेले उपविभागीय अधिकारी संजय बागडे यांचे वाहन चालक बाळासाहेब सहदेव निकरधन व शिपाई भाऊलाल देवचंद सोनवणे यांना येथील दादा बस्ते व इतर तिघांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ (प्रतिनिधी)