वाळूची चोरटी..जोड..
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
लिलावाच्या तोंडावर कारवाईची लगबग- जिल्हा प्रशासनाने यावेळी जिल्ह्यातील ४४ वाळूपट्टे लिलावासाठी काढले आहेत. या वाळूपट्ट्यांचा डिसेंबरअखेरीस ऑनलाईन लिलाव करण्यात ...
वाळूची चोरटी..जोड..
लिलावाच्या तोंडावर कारवाईची लगबग- जिल्हा प्रशासनाने यावेळी जिल्ह्यातील ४४ वाळूपट्टे लिलावासाठी काढले आहेत. या वाळूपट्ट्यांचा डिसेंबरअखेरीस ऑनलाईन लिलाव करण्यात आला होता. त्यात ९ पट्टे विकले गेले होते. मात्र, नंतर लिलाव प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यावर न्यायालयाने सर्व वाळूपट्ट्यांचा फेरलिलाव करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार येत्या आठवड्यात प्रशासनाकडून वरील ४४ पट्ट्यांचा फेरलिलाव करण्यात येणार आहे. लिलाव झाल्यानंतर लगेचच अधिकृत वाळू उपसा सुरू होणार आहे. एवढे दिवस चोरट्या वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष करणार्या प्रशासनाने आता लिलावाच्या तोंडावर कारवाईची लगबग सुरू केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.