वाळूज ९

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:35+5:302015-02-14T23:51:35+5:30

कचरा तसाच : एमआयडीसी व वडगाव को. ग्रा.पं.चा वाद

Sand 9 | वाळूज ९

वाळूज ९

रा तसाच : एमआयडीसी व वडगाव को. ग्रा.पं.चा वाद
बजाजनगरची स्वच्छता वार्‍यावर
वाळूज महानगर : एमआयडीसी व वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वादात बजाजनगरची स्वच्छता वार्‍यावर सोडण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून एमआयडीसीने कचरा उचलणे बंद केल्याने बजाजनगरात कचर्‍याचा खच साचला आहे.
बजाजनगर भागात सुविधा पुरविण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाकडे आहे; परंतु ग्रामपंचायत व एमआयडीसी प्रशासनात वाद सुरू आहे. एमआयडीसी प्रशासनाने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेऊन कचरा संबंधित ग्रामपंचायतीने उचलावा असे सांगून जबाबदारी झटकली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व जि. प. प्रशासनाने वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीला बजाजनगरच्या स्वच्छतेची जबाबदारी घेऊन पर्यायी व्यवस्था उभी करावी, असे आदेश ऑगस्ट २०१४ मध्ये दिले आहेत, तर ग्रामपंचायतीने विविध कारणे पुढे करून पर्यायी व्यवस्था उभी करण्यास वेळ लागेल. त्यामुळे जिल्हाधिकारी व जि. प. ने एमआयडीसी व ग्रामपंचायत यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढावा, असे सुचविले आहे. पाच महिने उलटून गेले तरी ग्रामपंचायतीने कचरा उचलण्यासंदर्भात अद्याप पर्यायी व्यवस्था केलेली नाही, तर दुसरीकडे एमआयडीसीने कोणतीही पूर्वसूचना न देता कचरा उचलणे दोन दिवसांपासून बंद केले आहे. दोन दिवसांपासून कचरा पडून असल्याने परिसरात दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनातच वाद सुरू असतील तर नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कर जमा केल्यास कचरा उचलू...
एमआयडीसीने नागरिकांना ९९ वर्षांच्या करारावर भूखंड विकले आहेत. त्यामुळे सुविधा पुरविण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. २५ वर्षांपासून एमआयडीसी प्रशासन झोपले होते काय? ग्रामपंचायतीकडे निधी नाही. कर्मचारी नाहीत. नागरिक एमआयडीसीला कर देत असल्याचे सांगून ग्रा.पं.ला कर देण्यास नकार देत आहेत. एमआयडीसीने सेवा कर जमा करून ग्रामपंचायतीला द्यावा. आम्ही कचरा उचलू.
सुनील काळे - उपसरपंच, वडगाव कोल्हाटी
----------------------
ग्रामपंचायतीची जबाबदारी
जि. प. प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतीला ऑगस्ट २०१४ ला च बजाजनगरचा कचरा उचलण्यासंदर्भात पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आदेश दिले आहेत. स्वच्छता राखणे हा ग्रामपंचायतीच्या अधिकारातला विषय असल्याने कचरा उचलण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीचीच आहे. आमचा करार संपला आहे. उलट जास्तीचे तीन महिने कचरा उचलला. याची सर्व माहिती जि. प. प्रशासनाला दिली आहे.
राजेंद्र गावडे- कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

Web Title: Sand 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.