सनातनचा अपमान केला, आज औरंगजेबाचे वंशज रिक्षा चालवतात; सीएम योगींचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:10 IST2024-12-20T16:09:17+5:302024-12-20T16:10:13+5:30
'सनातन धर्माने सर्व पंथ आणि धर्माला आपत्तीच्या काळात आश्रय दिला, पण प्रत्येक काळात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले.'

सनातनचा अपमान केला, आज औरंगजेबाचे वंशज रिक्षा चालवतात; सीएम योगींचे मोठे वक्तव्य
अयोध्या :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत आयोजित एका कार्यक्रमात संभल प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. प्रत्येक काळात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले, अयोध्या, संभल आणि भोजपूरमध्ये मंदिरे पाडण्यात आली. सनातन धर्माने सर्वांना आश्रय दिला, तरीदेखील मंदिरांना नुकसान पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला गेला, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ते अयोध्या धाममध्ये आयोजित 'अष्टोत्रशता 108 श्रीमद भागवत पाठ, पंच नारायण महायज्ञ' कार्यक्रमात बोलत होते.
प्रत्येक काळात हिंदूंना टार्गेट केलं
सनातन धर्माच्या महत्त्वाबाबत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणतात की, सनातन धर्म सुरक्षित असेल, तर सर्वजण सुरक्षित राहतील. सनातन धर्म हा एकमेव धर्म आहे, ज्याने प्रत्येक पंथ आणि धर्माला आपत्तीच्या काळात आश्रय दिला. पण हिंदूंच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. बांग्लादेशात, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात काय झाले? हे आपण सर्वजण पाहत आहोत. कधी काशी विश्वनाथ, कधी अयोध्या, कधी संभलम तर कधी भोजपूर...सर्वत्र हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले.
#WATCH | Ayodhya | Uttar Pradesh CM Yogi Adityanath says, "...I want to ask who were those people who destroyed the Sanatana Dharma's places of pride in the country and why did they do it? What was the intention behind it? It was a part of the conspiracy to make the whole earth a… pic.twitter.com/nFkTaoKSXP
— ANI (@ANI) December 20, 2024
मंदिरे पाडणाऱ्यांचे वंश नष्ट झाले
मला विचारायचे आहे की, सनातन धर्माची श्रद्धास्थाने पाडणारे कोण होते? असे करण्यामागे त्यांचा हेतू काय होता? या रानटी कृत्यांमधून संपूर्ण पृथ्वीला नर्क बनवण्याचा त्यांचा डाव होता. हिंदूंची अनेक मंदिरे नष्ट केली, पण आता मंदिरे पाडणाऱ्यांचेच वंश नष्ट झाले आहे. मी ऐकलंय की, औरंगजेबाचे वंशज आज कोलकात्याजवळ रिक्षा चालवतात. त्याने मंदिरे पाडली नसती, तर आज त्याच्या वंशजांना अशा अवस्थेत राहण्याची वेळ आली नसती. सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. हा धर्म सुरक्षित ठेवणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. धर्म आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता आणि शांतता पसरते, असेही सीएम योगी यावेळी म्हणाले.