शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

चीनला सॅमसंगचा मोठा धक्का; OLED डिस्प्ले प्रकल्पच भारतात उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 12:39 IST

भारत सरकार आणि सॅमसंगमध्ये 2019 च्या अखेरीस याबाबतचा करार झाला होता. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारत-चीन आणि कोरोना वादामुळे या कराराला महत्व आले आहे. चीनपेक्षा भारतात करामध्ये सूट मिळाल्याने सॅमसंगने हा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची कंपनी आणि जगभरात सर्वाधिक स्मार्टफोनचा खप असलेली सॅमसंगनेचीनला मोठा धक्का दिला आहे. सॅमसंग उत्तर प्रदेशमध्ये मोबाईल डिस्प्लेचा प्लांट उभारणार आहे. यासाठी ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. 

भारत सरकार आणि सॅमसंगमध्ये 2019 च्या अखेरीस याबाबतचा करार झाला होता. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारत-चीन आणि कोरोना वादामुळे या कराराला महत्व आले आहे. चीनपेक्षा भारतात करामध्ये सूट मिळाल्याने सॅमसंगने हा निर्णय घेतला आहे. सॅमसंग भारतामध्ये 705.75 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. यामुळे देशात 1300 नोकऱ्या उत्पन्न होणार आहेत. सॅमसंग ही जगातील सर्वात मोठी ओएलईडी पॅनल निर्माण करणारी कंपनी आहे. नोएडामध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार असून अन्य काही प्रकल्पही चीनमधून भारतात हलविण्याचा सॅमसंगचा विचार आहे. 

सॅमसंग कंपनीने नोएडामध्ये सर्वात मोठा स्मार्टफोन निर्मिती प्रकल्प उभारला आहे. कंपनीसोबत सध्या विविध लाभ देण्याबाबत चर्चा सुरु असून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे उत्तर प्रदेशचे उद्योग मंत्री सतीश महाना यांनी सांगितले. सध्या सॅमसंगचे तीन OLED डिस्प्ले निर्मितीचे प्रकल्प चीनमध्ये आहेत. तर नऊ प्रकल्प द. कोरियामध्ये व एक व्हिएतनाममध्ये आहे. कंपनीने आधीच एलसीडी व्यवसायातून बाहेर पडण्याचे जाहीर केले असून OLED आणि QLED वर लक्ष केंद्रीत केले आहे. भारताने कोरोनामुळे नाराजी असल्याने चीनमध्ये असलेल्या कंपन्यांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यांत काही कंपन्यांनी भारतात प्लँट हलविण्याची घोषणाही केली आहे. 

मोबाईल साहित्य बनविणारी कंपनी लावा इंटरनॅशनल ने चीनला मोठा झटका दिला आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, चीनमधील प्रकल्प कायमचा बंद करून भारतात येत आहोत. कंपनीच्या संचालकांचे म्हणणे आहे की, आम्ही आता भारतातून चीनला मोबाईल निर्यात करणार आहोत. यासाठी पुढील पाच वर्षांत भारतात ८०० कोटी रुपये गुंतविण्यात येणार आहेत. तसेच जर्मनीचा फुटवेअर ब्रँड वॉन वेल्स (Von Wellx) चीनमधील उत्पादन प्रकल्प भारतात स्थलांतरीत करणार आहे. भारतात हा प्रकल्प आग्रामध्ये स्थापन केला जाणार असून लॅट्रिक इंडस्ट्रीसोबत कंपनीने करार केल्याचे समजत आहे. 

सॅमसंगला हुवावेने काढले मागेसॅमसंग ही कंपनी स्मार्टफोन विक्रीमध्ये जगामध्ये एक नंबरला होती. य़ा कंपनीला चीनची कंपनी हुवावेने मागे टाकले आहे. एप्रिलमध्ये हुवावेने सॅमसंगचा मागे काढले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

नागिन २ मधील अभिनेत्री चाहत पांडेला अटक; मामाच्या घरामध्ये केला 'तमाशा'

काँग्रेसचे नाराज मंत्री आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; खदखद व्यक्त करणार

India China Face Off: ओप्पोने घेतला 'बायकॉट'चा धसका; Find X2 चे लाईव्ह लाँचिंगच केले रद्द

India China Face Off: चीनच्या वर्मावरच बोट; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार

यंदा मला जिंकवा! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली चीनकडे मदत

Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल

घरातच काढलेत! हे भन्नाट फोटो पहाल तर चक्कर येऊन पडाल

टॅग्स :samsungसॅमसंगchinaचीनIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश